Tirupati Laddu Controversy: "सर्वकाही शुद्ध झालंय, आता काळजी नाही"; लाडूच्या वादावर पार पडलं 'शांती होम हवन'

शुद्धीकरणासाठी काय तोडगा काढता येईल अशी विचारणा आंध्र प्रदेशच्या सरकारनं तिरुपती देवस्थानकडं केली होती.
Tirupati Balaji
Tirupati Balaji
Updated on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीच्या प्रसिद्ध असलेल्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर हा वाद शांत करण्यासाठी शुद्धीकरणाचा तोडगा तिरुपती मंदीर प्रशासनाकडून काढण्यात आला आहे. शांती होम हवनद्वारे हा शुद्धीकरणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर "सर्वकाही शुद्ध झालंय, आता भाविकांनी काळजी करण्याची गरज नाही," असं मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी म्हटलं आहे.

Tirupati Balaji
Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

यावर आता मंदिराच्या शुद्धीकरणासाठी काय तोडगा काढता येईल? अशी विचारणा आंध्र प्रदेशच्या सध्याच्या सरकारनं तिरुपती देवस्थानकडं केली. त्यावर शांती होमम करण्याचा प्रस्ताव घेऊन आम्ही देवस्थानच्या व्यवस्थापनाकडं गेलो, अशी माहिती मंदिराचे प्रमुख पुजारी कृष्ण सेशाचला दिक्षीतूलू यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, "व्यवस्थापनानं याला मंजुरी दिल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही निश्चित केलं की, उद्या पहाटे ६ वाजल्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात हे होम हवन करुन तिरुपती बालाजीची यासाठी परवानगी घेतली. हे होम हवन पूर्ण झाल्यानं आता सर्वकाही शुद्ध झालं आहे. त्यामुळं माझी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी आता काहीही काळजी करण्याचं कारण नाही. बालाजीच्या दर्शनाला त्यांनी यावं आणि प्रसाद घेऊन घरी जावं"

Tirupati Balaji
Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

तिरुपतीच्या लाडूमध्ये वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये मासे, गोवंश, डुक्कराच्या चरबीचे काही अंश आढळून आल्याचं गुजरातमधील सरकारी लॅबनं केलेल्या तपासणीत आढळून आलं. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. तत्पूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ज्या काळात हा प्रकार घडला त्यावेळचे मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांना टार्गेट करत त्यांनाच जबाबदार धरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.