Tirupati Temple : लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी; आता 'या' राज्यानं देखील घेतला 'प्रसाद' तपासणीचा निर्णय

Tirupati laddu controversy : कर्नाटकात एंडोमेंट विभागाच्या देखरेखीखाली ३४ हजार मंदिरे आहेत.
Tirupati laddu Controversy
Tirupati laddu Controversyesakal
Updated on
Summary

''राज्यातील मंदिरांमध्ये अशा कोणत्याही घटना किंवा फसवणूक झाल्याची घटना नाही. पण, भक्तांना शंका नको म्हणून आम्ही प्रसादाची तपासणीचे आदेश देऊ.''

बंगळूर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात (Tirupati Temple) दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता कर्नाटकातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांना दिला जाणारा प्रसाद चाचणीनंतर भक्तांना वाटला जाईल, असे धर्मादाय विभागाचे (Charity Department) मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.

कर्नाटकात एंडोमेंट विभागाच्या देखरेखीखाली ३४ हजार मंदिरे आहेत. त्यापैकी ‘अ’ वर्ग २०५ मंदिरांचे वार्षिक उत्पन्न २५ लाखांपेक्षा जास्त आहे. ‘ब’ वर्ग १९३ मंदिरांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख ते २५ लाख रुपये आहे. उर्वरित पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली मंदिरे ‘क’ वर्ग म्हणून वर्गीकृत आहेत. राज्यातील मंदिरांमध्ये अशा कोणत्याही घटना किंवा फसवणूक झाल्याची घटना नाही.

Tirupati laddu Controversy
Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

पण, भक्तांना शंका नको म्हणून आम्ही प्रसादाची तपासणीचे आदेश देऊ. सर्व प्रमुख मंदिरांना केवळ कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ) द्वारे पुरवलेले नंदिनी तूपच वापरावे. इतर कोणत्याही ब्रँडचे तूप वापरू नये, यासाठी परिपत्रक जारी केले जाईल. कर्नाटक अनेक वर्षांपासून लाडू बनवण्यासाठी तिरुपतीला नंदिनी तुपाचा पुरवठा करत आहे.

Tirupati laddu Controversy
Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.