पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनं ममता बॅनर्जी याआधीच बॅकफूटवर आलेल्या आहेत.
Cattle Smuggling Case : गुरे तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत CBI नं TMC नेते अनुब्रता मंडल (Anubrata Mandal) यांना अटक केलीय. आज सकाळी CBI टीम अनुब्रत मंडल यांच्या घरी पोहोचली होती. अनुब्रता मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे TMC अध्यक्ष आहेत.
अनुब्रत मंडल यांची अशा स्थितीत अटक म्हणजे, ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) मोठा धक्का मानला जात आहे. कारण, याआधी पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनं त्या बॅकफूटवर आलेल्या आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, त्यामुळं ममता सरकारला हा आणखी धक्का आहे.
या प्रकरणी सीबीआयनं पाठवलेल्या 10 समन्सला अनुब्रता मंडल यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यानंतर एजन्सीनं न्यायालयात धाव घेतली. याआधीही सीबीआयनं त्यांची दोनदा चौकशी केलीय. सीबीआयनं 2020 मध्ये प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, यामध्ये अनुब्रत मंडल यांचं नाव समोर आलं होतं. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 2015 ते 2017 दरम्यान बीएसएफनं 20,000 प्राण्यांची शीर जप्त केली होती. या प्राण्यांची सीमा ओलांडून तस्करी केली जात होती. याच प्रकरणी सीबीआयनं नुकतेच अनेक ठिकाणी छापे टाकले होते. एजन्सीनं मंडलांचा अंगरक्षक सैगल हुसेन याला आधीच अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.