Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra In West Bengal : देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेला महत्व प्राप्त झालं आहे. मणिपूर येथून सुरु झालेल्या या यात्रेचा आज १२ वा दिवस आहे. तसेच ही यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडी बाबत काल महत्वाची भूमिका घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत स्वतंत्र्य लढण्याचा निर्णय घेतल्याने आज पश्चिम बंगाल मध्ये दाखल होत असलेल्या यात्रेवा महत्व आलं आहे.
ममता यांनी यात्रेत सहभागी व्हावं यासाठी यापूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पत्र लिहिली आहेत. या पत्रांना मान देऊन ममता बॅनर्जी यात्रेत सहभागी होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीला झटका...
नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएचा लोकसभा निवणुकीत पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या पक्षांच्या इंडिया आघाडीत मागच्या काही दिवसांपासून बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. बंगालमध्ये जागा वाटपावरून काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या मागणीवरून ममता बॅनर्जी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसचे बंगालमधून जात असलेल्या आपल्या यात्रेचा कार्यक्रम देखील काँग्रेसने सांगितला नाही, जर इतका समन्वय देखील नसेल तर बंगालमध्ये् आपण एकटे निवडणूक लढणार असे त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.