Derek O'Brien suspended : राज्यसभा सभापतींवर ओरडणं पडलं महागात, टीएमसीचे खासदार निलंबित

 TMC MP derek obrien suspended from rajya sabha Jagdeep Dhankhar
TMC MP derek obrien suspended from rajya sabha Jagdeep Dhankhar
Updated on

नवी दिल्ली : आज राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी गोंधळ सुरू होता. यादरम्यान टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे उभे राहून मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली. यादरम्यान सभापतींनी त्यांना शांत राहण्याची सूचना केली. ब्रायन यांनी त्यांच म्हणणं न ऐकल्याने सभापती देखील नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी डेरेक ओ ब्रायन यांना देखील खडे बोल सुनावले.

यादरम्यान भाजप खासदार पीयूष गोयल यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि डेरेक ओ ब्रायन यांना राज्यसभेत निलंबित करण्यात आले. यानंतर लगेच सभागृहाचे कामकाज गुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांना देखील गोंधळ घातल्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवशेनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केलं होते.

 TMC MP derek obrien suspended from rajya sabha Jagdeep Dhankhar
Ravikant Tupkar News : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत...; पक्ष सोडण्याबाबत रविकांत तुपकरांनी स्पष्ट केली भूमिका

नेमकं काय झालं?

टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सभापतींच्या खुर्चीकडे पाहून आरडाओरड करत पॉइंट ऑफ ऑर्डर दिलं होतं. यानंतर सभापती धनखड यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? असे विचारताच डेरेक ओ ब्रायन आणि मोठ्याने ओरडले आणि आपण कम्युनिकेट केलं पाहिजे अशी मागणी करू लागले. मणिपूर मुद्द्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. यानंतर सभापती नाराज झाले आणि त्यांनी जर कोणत्याही सदस्यास पॉइंट ऑफ ऑर्डर पाहिजे असेल मात्र उभं राहून तो देत नसतील... आणि त्यावर भाषण द्यायला सुरू करत असतील तर हे योग्य नाही.

नुसतीच स्पेस हवी असेल तर ते बरोबर नाही. यानंतर धनखड यांनी, तुम्ही कोणत्या नियमानुसार पॉइंट ऑफ ऑर्डर देत आहात ते मला सांगा असं विचारलं. यावर डेरेक ओ ब्रायन यांनी उत्तर दिलं की, रुल पेज ९२ वर असून नियम २६७ आहे. विरोधी पक्षाचे नेते सतत मणिपूरवर चर्चेची मागणी करत आहेत, असे म्हणत ब्रायन ओरडू लागले. यानंतर त्यांना सभापतींनी निलंबित केले.

 TMC MP derek obrien suspended from rajya sabha Jagdeep Dhankhar
Ambareesh Murty Death : पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पीयूष गोयल यांनी निलंबनाचा प्रस्ताव वाचताना सांगितलं की, सतत सभागृहाचे कामकाजात सतत आडथळा आणल्याबद्दल आणि अध्यक्षांची अवज्ञा केल्याबद्दल डेरेक ओ ब्रायन यांना सभागृहातून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडत आहे. सभापतींनी तातडीने प्रस्ताव मजूर केला. डेरेक ओ ब्राययन यांना चालू सत्राच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहात असंसदीय वर्तन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.