कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर ममत बॅनर्जी यांच्या सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली. आदरम्यान आता बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकार यांनी रविवारी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहीले आहे, या पत्रात त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून आपण राजीनामा देत असून राजकारण देखील सोडत असल्याची घोषणा केली आहे.