Mahua Moitra: सरकार माझा फोन हॅक करतंय, Apple ने मेसेज करत दिला इशारा'; महुआ मोईत्रांचा अदानी अन् मोदींवर मोठा आरोप

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
tmc mp mahua moitra
tmc mp mahua moitra e sakal
Updated on

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, मला अॅपलकडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.

गृहमंत्रालयाला टॅग करत महुआ मोईत्रा यांनी पुढे लिहिले आहे की, अदानी आणि पीएमओचे लोक, जे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला वाटणाऱ्या भीतीमुळे मला तुमची दया येते. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, मला आणि भारत आघाडीच्या इतर तीन नेत्यांना आतापर्यंत असे अलर्ट मिळाले आहेत.

tmc mp mahua moitra
Mukesh Ambani: मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकी, 200 कोटीनंतर आता 400 कोटींची मागणी

काय प्रकरण आहे?

नुकतेच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केले होते. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते. जय अनंत देहादराय यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत.

निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते.

tmc mp mahua moitra
Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचे मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले. 17 ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केले की, आपल्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत.

महुआ मोइत्रा यांच्या याचिकेत न्यायालयाने दुबे, देहादराई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊसना त्यांच्या विरोधात कोणतीही बनावट आणि बदनामीकारक पोस्ट, प्रसारित किंवा प्रकाशित करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश जारी करावेत अशी मागणी केली आहे. मात्र, महुआच्या वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली. आता या प्रकरणाची सुनावणी ३१ ऑक्टोबरला होणार आहे.

tmc mp mahua moitra
नॅनो प्रकरणात टाटांचा विजय! बंगालला द्यावे लागणार 766 कोटी, ममतांच्या विरोधामुळे प्लांट झाला होता बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.