Mahua Moitra: निलंबनाच्या कारवाईनंतर महुआ मोइत्रांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लोकसभा म्हणजे...

'कॅश फॉर क्वरी' प्रकरणात तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं आज लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे.
Mahua Moitra
Mahua Moitrasakal
Updated on

नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं आज लोकसभेतून निलंबन करण्यात आलं. मोइत्रा यांना लोकसभेत त्यांची बाजू मांडू द्यावी त्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी काँग्रेससह इतर पक्षांनी सभागृहात केली.

पण अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना बोलण्याची संधी न देता निलंबनाचा निर्णय दिला. त्यामुळं इतर पक्षांनी सभागृहातून वॉकआऊट केलं. दरम्यान, कारवाईनंतर मोइत्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (TMC MP Mahua Moitra expressed after expelled from the Lok Sabha)

महुआ मोइत्रा म्हणाल्या, "या लोकसभेनं संसदीय समितीचं हत्यार म्हणून वापर झाल्याचं देखील पाहिलं आहे. गंमत म्हणजे, सदस्यांसाठी नैतिक व्यवहारांची आठवण रहावी म्हणून आचारसंहिता समितीची स्थापना करण्यात आली होती. पण त्याऐवजी, जे करायला नको त्या कामासाठी या समितीचा आता गैरवापर केला गेला आहे.

Mahua Moitra
Cash for Query: तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन! 'कॅश फॉर क्वरी' प्रकरणं भोवलं

या समितीचा वापर विरोधी पक्षाला उद्ध्वस्त करण्यासाठी शस्त्र म्हणून वापर केला आहे. या समितीनं माझ्याबाबतचा जो निष्कर्ष दिला तो केवळ दोन खाजगी नागरिकांच्या लेखी साक्षींवर आधारित आहे. ज्यांच्या साक्षी खरंतर एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण त्यांना उलटतपासणी करण्याची परवानगी मला दिली गेली नाही.

Mahua Moitra
Fire News : पिंपरी-चिंचवडमधील कारखान्याला आग; सहा जणांचा मृत्यू

या दोन लोकांपैकी एक माझा जवळचा सहकारी आहे ज्यानं वाईट हेतून समितीसमोर एक सामान्य नागरिक म्हणून मुखवटा धारण केला आहे. या दोघांच्या साक्षी मला लटकवण्यासाठीच घेतल्या गेल्या आहेत. ज्यांच्यामध्ये एकवाक्यताही नाही, अशा शब्दांत महुआ मोइत्रा यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()