"महिला मुख्यमंत्री असतानाही…"; ममता बॅनर्जींना खासदाराचा घरचा आहेर

tmc mp said on minor rape case with a woman as cm even a single crime against women is shameful
tmc mp said on minor rape case with a woman as cm even a single crime against women is shameful
Updated on

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील एकही गुन्हा लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येच्या संदर्भात सौगता रॉय यांचे वक्तव्य केले आहे. तृणमूल पक्षाचे खासदार म्हणाले की, बंगालमध्ये महिलांवरील गुन्हे हे लाजिरवाणे आहे, कारण स्वतः एक महिला ही राज्याची मुख्यमंत्री आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यानंतर, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते सौगता रॉय यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथे अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणावरील वक्तव्याचा निषेध केला आहे.

डमडम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेले रॉय यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांच्या किरकोळ घटना आणि मरण पावलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रेम प्रकरणाशी संबंध जोडणाऱ्या विधानांचा अप्रत्यक्षपणे विरोध केला.

tmc mp said on minor rape case with a woman as cm even a single crime against women is shameful
भाजप नेत्यांनाच कसा दिलासा मिळतो? गृहमंत्री वळसेंचा सवाल

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना रॉय म्हणाले की, एका महिला मुख्यमंत्री असताना एकाही महिलेविरोधात गुन्हा होण्याची एकही घटना अस्वीकार्य आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत आपण सर्वच चिंतेत आहोत. अशा प्रकरणी शून्य सहनशीलतेचा दृष्टीकोन अवलंबला पाहिजे. महिलांवर अत्याचाराची एकही घटना ही महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यासाठी शरमेची बाब आहे. हे सहन केले जाऊ नये. आणि अशा घटनांनंतर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. मला खात्री आहे की पोलिस या प्रकरणाची चौकशी करतील," रॉय म्हणाले.

12 एप्रिल रोजी महुआ मोइत्रा या म्हणाल्या होत्या की, अल्पवयीन व्यक्तीसोबत, म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्यानुसार बलात्कार आणि गुन्हा आहे. अल्पवयीन पीडितेच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते. पक्षाचा खासदार म्हणून मला एवढेच सांगायचे आहे की मी अशा घटनांच्या विरोधात आहे. मी इतरांबद्दल बोलू शकत नाही. पण मी अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असे मोईत्रा म्हणाल्या होत्या.

tmc mp said on minor rape case with a woman as cm even a single crime against women is shameful
तुमच्या PF खात्यात किती पैसे आहेत, असे तपासा

प्रिव्हेन्शन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायदा, 2012 या नुसार, अगदी संमतीने लैंगिक संबंधात अल्पवयीन मुलीचा समावेश असेल तर तो बलात्कार मानला जातो.

भाजप, सीपीआय-एम आणि काँग्रेसच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सौगता रॉय या विषयावर स्पष्टपणे बोलल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांनी म्हटले आहे की रॉय एका जबाबदार खासदारासारखे बोलले आहेत. मात्र, या मुद्द्यावर रॉय यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या म्हणाल्या होत्या की, "जे घडले ते योग्य नाही. मी त्याचा निषेध करते. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पण विरोधी पक्ष आणि मीडियाचा एक भाग या संपूर्ण घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मझ्या माहितनुसार आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध असल्याची बातमी आहे. मग तपास पूर्ण होण्याआधीच निकालापर्यत का पोहोचू?"

tmc mp said on minor rape case with a woman as cm even a single crime against women is shameful
गुगल देणार 12 हजार लोकांना नोकरी; जाणून घ्या कंपनीचा संपूर्ण प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.