TMCचा एक खासदार निलंबित; सभागृहात मंत्र्याच्या हातातील फाडली कागदपत्रे

TMCचा एक खासदार निलंबित; सभागृहात मंत्र्याच्या हातातील फाडली कागदपत्रे
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव या पेगॅसस पाळत प्रकरणी केंद्र सरकारची बाजू राज्यसभेत मांडण्यास उभे राहिले होते. मात्र, तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार (TMC MP) पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकले. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minister Ashwini Vaishnaw) यांना आपलं म्हणणं पूर्ण करता आलं नाही.

TMCचा एक खासदार निलंबित; सभागृहात मंत्र्याच्या हातातील फाडली कागदपत्रे
महाडमध्ये महाप्रलय! नौदलाने टिपली छायाचित्रे
TMCचा एक खासदार निलंबित; सभागृहात मंत्र्याच्या हातातील फाडली कागदपत्रे
Pegasus प्रकरण राज्यसभेत तापलं; सदस्यांनी मंत्र्याच्या हातातली कागदपत्रे फाडली

या प्रकरणी आता तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांना राज्यसभेतून चालू सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. अशोभनिय वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने संसदेच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण झाला. त्यानंतर संसदेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. 11 वाजता सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल गुरुवारी झालेल्या घटनेचा उल्लेख करत ते सभागृहामधील अशोभनिय वर्तन असल्याचा निर्वाळा दिला. त्यांनी म्हटलं की, काले जे घडलं ते निश्चितपणे चुकीचं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.