Shatrughna Sinha: "केंद्रातही डबल इंजिन असायला काय हरकत?"; शत्रुघ्न सिन्हांच्या विधानानं नव्या चर्चेला फुटलं तोंड

'इंडिया'आघाडीकडं पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. यासाठी अनेकजण सक्षम, मॅच्युअर आणि विद्वान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार म्हणजे डबल इंजिनचं सरकार असं समीकरण भाजपच्या नेत्यांनी तयार केलं आहे. पण हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदासाठी का लागू होऊ नये? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळं नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. (TMC Shatrughn Sinha Mamata Banerjee Prime Minister of India President Droupadi Murmu)

shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
Chandrachud Fake Message: व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात CJI चंद्रचूड यांच्या नावे फिरतोय फेक मेसेज; काय आहे प्रकरण?

माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "आज जर महिला राष्ट्रपती आहे तर महिला पंतप्रधान का होऊ शकत नाही? लोकांना पडलेला हा प्रश्न आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाचे नेते डबल इंजिन सरकार असं म्हणत असतात. तसंच डबल इंजिन इथंही महिलांच्याबाबतीत व्हायला हवं. म्हणजेच राष्ट्रपतीपदी महिला आहेतच तर पंतप्रधानपदी देखील महिला असायला काय हरकत?" (Marathi Tajya Batmya)

'इंडिया' आघाडीकडं पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. यासाठी अनेकजण सक्षम, मॅच्युअर आणि विद्वानही आहेत. प्रयत्नशील, कामानं सिद्ध आणि यशस्वी देखील आहेत. त्यांना पंतप्रधान व्हायला काहीही अडचण नाही. मग त्यांच्याकडं कुठला चेहरा आहे, एकच चेहरा आहे, असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

shatrughna Sinha Criticise On narendra Modi due to Rafeal deal
Chandrachud Fake Message: व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात CJI चंद्रचूड यांच्या नावे फिरतोय फेक मेसेज; काय आहे प्रकरण?

शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळं त्यांचं विधान हे पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात आहे. यावरुनच त्यांनी थेटपणे ममतांनी पंतप्रधान व्हावं अशी मागणी केलेली नसली तरी त्या नक्कीच पंतप्रधान होण्यास सक्षम असल्याचं त्यांनी सुचवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.