नवी दिल्ली : दिल्लीत एका बापानं आपल्या जिम ट्रेनर असलेल्या २९ वर्षीय मुलाची त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. पण आता या घटनेत मोठा खुलासा झाला आहे. आपल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी या व्यक्तीनं आपल्या तरुण मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (to teach his wife lesson father took murder of his 29 year old son who was a gym trainer)
पोलिसांच्या माहितीनुसार, रंगलाल (वय ५४) असं आरोपी बापाचं नाव आहे. त्यानं जिम ट्रेनर असलेल्या गौरव सिंघल या आपल्या २९ वर्षीय मुलाची ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री हत्या केली आणि तो फरार झाला होता. ज्याला आता जयपूरमधून अटक करण्यात आली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आरोपी आपल्या मुलाला ठार करण्याची योजना आखत होता. आरोपी बाप रंगलाल यानं मुलगा गौरव याच्या चेहऱ्यावर आणि छातीत धारदार चाकूनं १५ वार केले. दक्षिण दिल्लीतील त्यांच्या घरातच त्यानं हे कृत्य केलं. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, आरोपी बापाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं मुलाला का मारलं? याचा खुलासा झाला आहे. त्यानुसार, रंगलालचं आपली पत्नी आणि मुलासोबतचे नातेसंबंध ठीकठाक नव्हते. त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. बायकोसोबत वारंवार वाद होत असल्यानं या बायकोलाच धडा शिकवण्यासाठी त्यानं मुलाला जीवे मारण्याचा प्लॅन रचला. (Latest Maharashtra News)
प्लॅन कसा रचला?
पोलिसांनी सांगितलं की, मुलाची हत्या करण्यासाठी त्यानं सुरुवातीला तीन जणांना सुपारी दिली होती. त्यासाठी त्यानं ७५,००० रुपये मारेकऱ्यांना दिले होते. दरम्यान, ज्या दिवशी गौरवची हत्या झाली त्या रात्री रंगलाल आणि गौरव यांच्यामध्ये जोरदार भाषण झालं होतं आणि रागामध्ये गौरवनं बापाच्या कानशिलात लगावली होती. पण गौरवला या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नव्हता उलट आपण केलं ते योग्यचं होतं, असं त्याला वाटत असल्याचं रंगलाल यांनी पोलिसांशी बोलताना सांगितलं. (Latest Marathi News)
पुढे रंगलालनं सांगितलं की, आपल्या मुलाच्या उधळपट्टीच्या जीवनशैलीवर आणि आपलं तो ऐकत नसल्यानं त्याच्यावर नाखूष आहे. त्याच्या आईनं देखील नेहमीच आपल्या मुलाला पाठिंबा दिला, ज्यामुळं आपण निराश झालो होतो,” असंही रंगलाल यानं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं.
आरोपी बापाकडं अटकेवेळी 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि 15 लाख रुपये रोख होते, जे घेऊन तो घरातून पळून गेला होता, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.