आज भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावर बालासोर येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. नवीन तांत्रिक विकास सुसज्ज अशा या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती संरक्षण स्त्रोतांनी दिली आहे.
भारताने नवीन नियंत्रण प्रणालीसह स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र #BrahMos ची चाचणी केली. प्रभावी चांगल्या कामगिरीसाठी या नव्या सुधारणा केल्या आहेत. (Today India successfully testfired a new version of the BrahMos supersonic cruise missile off the coast of Odisha in Balasore)
ब्राह्मोस काय आहे? (What is Brahmos?)-
ब्राह्मोस एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल (Supersonic cruise missile) आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या बनवलेली ही मिसाईल जगातील सर्वोत्तम मिसाईलपैकी एक आहे. ब्राह्मोसच्या तिन्ही संरक्षण दलांसाठी ब्राह्मोसच्या विविध आवृत्त्यांची निर्मिती केली आहे. तसेच ब्राह्मोसला सतत अद्ययान्वित केले जाते. ब्राह्मोस पाणबुडी, जहाज तसेच एअरक्राफ्ट अथवा जमिनीवरून लाँच करता येते. मिसाइल टू स्टील्थ सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे. पहिल्या टप्प्यात हे क्षेपणास्त्र सॉलिड प्रॉपलंट बुस्टर इंजिनच्या मदतीने सुपरसॉनिक गती प्राप्त करते आणि दुसर्या टप्प्यात लिक्विड रॅमजेट इंजिनच्या साहाय्याने तीन मॅक स्पीड धारण करते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.