Vinod Tawade
Vinod Tawade esakal

Vinod Tawade : लालूंचा डाव उलटवला अन् विश्वासमत परीक्षा जिंकली ! बिहार सावरला मराठी तावडेंनी !

Nitish Kumar wins Bihar vidhabsabha Floor test: भाजपचे काही आमदार तावडे यांच्या व्यूहरचनेनुसार दूर राहिले अन् डाव सावरला.
Published on

मुंबई, ता. १२ : लालूप्रसाद यादव यांनी विश्वासमत चाचणीत शेवटपर्यंत कडवी झुंज दिल्याने बाजी नितीश आणि भाजपच्या हातून जात होती, पण बिहारचे प्रभारी महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांनी ऐनवेळी केलेल्या व्यूहरचनेमुळे आज बाजी जिंकता आली. भाजपचे काही आमदार तावडे यांच्या व्यूहरचनेनुसार दूर राहिले अन् डाव सावरला.

सत्ताधाऱ्यांकडे १२८ आमदार होते; तर राजद काँग्रेस आणि अन्य पक्षांकडे ११५ आमदार होते. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. सरकारकडे बहुमत असल्याच्या समजुतीतल्या जदयू आणि भाजपला लालू आणि तेजस्वी यादव यांनी धडा शिकवायचे ठरवले. सरकार टिकणार नाही, असे सांगत विश्वासमताला १४ दिवस असताना ‘जदयू’चे ५ आणि भाजपचे ३ आमदार लालूंनी गळाला लावले.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील प्रस्तावासाठी १२२ मते हवी होती, पण विजय मिळवणे भाजप आणि ‘जदयू’ला अवघड झाले. सरकारचा पराभव दिसू लागला. विनोद तावडे कामाला लागले. ३६ तासांत जदयूचे ३ आमदार परत मिळवले आणि राजदचे ३ फोडले. बिहार विधानसभेत अध्यक्ष विरोधात हा प्रस्ताव १२५ विरुद्ध ११२ मतांनी पारित झाला.

मग भाजपचे ३ आणि जदयूचा १ असे ४ आमदार नितीश सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव येण्यापूर्वी सभागृहात उपस्थित केले. त्यामुळे १२९ मतांनी नितीश सरकारचा प्रस्ताव पारित झाला. काल ११ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मते लालू यादवांच्या बाजूने होती, पण तावडेंनी राजकीय कौशल्याचा वापर करून डाव पलटवला आणि सरकार पास झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.