Toilet Seat Tax in HP : हिमचल प्रदेशात घरातील टॉयलेट सीटच्या संख्येनुसार भरावा लागणार टॅक्स? सरकारने दिलं स्पष्टीकरण

CM Sukhu on toilet seat tax claims : हिमाचल प्रदेशच्या सुखविंदर सिंह सुक्खू आता राज्यात टॉयलेट सीट टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात आले होते, मात्र हा दावा हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे.
CM Sukhu on toilet seat tax claims
CM Sukhu on toilet seat tax claims
Updated on

हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर सिंह सुक्खू सरकार आता राज्यात टॉयलेट सीट टॅक्स वसूल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात आले होते. लोकांना आता त्यांच्या घरात असलेल्या टटॉयलेट सीट्सच्या संख्येच्या आधारावर टॅक्स द्यावा लागणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले होते. आर्थिक संकटाशी लढत असलेल्या राज्य सरकारने नुकतेच यासंबंधी अधिसूचना जारी केल्याचा दावा देखील करण्यात आला होता. दरम्यान या दाव्याबद्दल आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

नेमका प्रकार काय आहेय़

काही माध्यमांमधून दावा करण्यात आला होता की, हिमाचल प्रदेशमधील सुखविंदर शिंह सुक्खू सरकारने काढलेल्या एका सीवरेज आणि पाण्याच्या बिलाशी संबंधीत सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे की, कोणत्याही शहरी भागातील लोकांना आपल्या घरात बांधलल्या टॉयलेटच्या प्रत्येक सीटसाठी २५ रुपये शुल्क द्यावे लागेल. सीवरेज बिलसोबत हे अतिरिक्त शुक्ल जल शक्ती विभागात ट्रान्सफर केले जाईल. तसेच सीवरेज बिल पाण्याच्या बिलाच्या ३० टक्के असेल.

या नोटिफिकेशनमध्ये जे लोक आपल्या स्वतःच्या सोर्समधील पाणी वापरतात आणि फक्त सरकारी सीवरेज कनेक्शन वापरतात त्यांना प्रति महिना टॉयलेट सीट २५ रुपेय शुक्ल द्यावे लागेल. विभागाने याबद्दलचे आदेश सर्व मंडळ अधिकाऱ्यांना जारी केले आहेत असेही सांगण्यात आले होते.

सर्वसाधारणपणे लोकांच्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त टॉयलेट बांधले जातात आणि आता प्रत्येक टॉयलेट सूटवर शुल्क आकारले जात असल्याने या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होती. हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ५ महानगरपालिका, २९ नगरपालिका आणि १७ नगर पंचायती आहेत. ज्यांची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. सरकारने असा काही आदेश काढल्यास याचा मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

सरकारने काय म्हटलंय?

दरम्यान हिमाचल रप्रशेश सरकारच्या जल शक्ति विभागाने एक निवेदन जारी करत टॉयलेट सीट टॅक्स आकरण्यात येत असल्याचा दावा फेटाळला आहे. विभागाने स्पष्ट केले की टॉयलेट सीटसंबंधी कुठलीही अधिसूचना सध्याच्या राज्य सरकारने जारी केलेली नाही. सीवरेज कनेक्शन पूर्वीप्रमाणेच दिले जातील. तसेच आमचे लक्ष्य १०० टक्के कनेक्टिव्हिटी पूर्ण करणे आहे. जेणेकरून प्रदूषण कमी केले जाऊ शकेल आणि सीवरेजवर ट्रीटमेंट केली जाईल. सध्या फक्त पाणी शुल्काबद्दल अधिसूचना जारी करण्यात आली आहे, बाकीच्या गोष्टी पूर्वीप्रमाणेच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच शुक्रवारी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राज्य सरकारकडून टॉलेट सीट टॅक्स लावल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. हे वृत्त आधारहिन असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने ते (भाजप) हिंदू-मुस्लिम आणि सिवरेज यांच्याविषयी बोलत आहे. पण असे काहीही नाही. हे पूर्णपणे खोटे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.