Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढले देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

एप्रिल महीन्यातच या प्रकारची वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होती
Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री
Toll Rate Hike in india sakal
Updated on

Toll Naka : लोकसभेचे मतदान संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्रीपासून संपुर्ण देशातील सर्वच टोलनाक्यांवर ही दरवाढ झाली आहे. (toll plaza rates hike)

३ ते ५ टक्के अधिकचा टोल आजपासून आकारला जाणार आहे. एप्रिल महीन्यातच या प्रकारची वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीमुळे निर्णय राखून ठेवण्यात आला होता. (NHAI news )

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री
Toll : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहनांना टोलमाफी हवी; नागरिकांची मागणी

टोलच्या दरात संशोधन करण्यात आले आहे. अशी माहीती एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रविवारी रात्री १२ वाजल्यापासून ही टोल दरवाढ लागू केली जात आहे. यामुळे प्रत्येक टोलमागे ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली गेली आहे. देशभरात जवळपास ११०० टोलनाके आहेत.(highway authority hikes rates by 3-5%)

या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन या कंपन्यांना होणार आहे. आर्थिक वर्ष 2018/19 मध्ये 252 अब्ज रुपयांचा टोल देश भरात वसूल करण्यात आला होता. तर आर्थिक वर्ष 2022/23 मध्ये टोल संकलन 540 अब्ज रुपये इतके झाले होते.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री
Satellite Toll System : सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टम काय आहे? हायवेवरून टोल प्लाझा होणार गायब, जाणून घ्या

3 जून 2024 म्हणजेच आजपासून टोलच्या दरात 3 ते 5 टक्के वाढ लागू करण्यात आली आहे. निवडणुकीही वाढ पुढे ढकलण्यात आली होती,मात्र आता निवडणूक प्रक्रिया संपताच 3 जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री
Toll Collection: देशात जीपीएसद्वारे टोलवसुली होणार सुरू; फास्टॅग होणार इतिहासजमा, कसं ते जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.