Tomato Price : खुशखबर ! इथे मिळतात निम्म्या किंमतीत टोमॅटो, फक्त एकच अट..

मंडईत टोमॅटो मिर्चीच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसाधारण घरांतून टोमॅटो, आलं आणि मिर्चीची चवच गायब झालीय
Tomato Price
Tomato Price esakal
Updated on

Tomato Price : अतिपावसाचा पिकांवर परिणाम झाला असून टोमॅटो, हिरवी मिर्ची अन् कोथिंबीर याच्या किंमत दुप्पटीने वाढ झालीय. त्यामुळे मंडईतही त्याची आवकही कमी झाली आहे. गृहिणींचा बजेटही त्यामुळे कोलमडलाय. मंडईत टोमॅटो मिर्चीच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसाधारण घरांतून टोमॅटो, आलं आणि मिर्चीची चवच गायब झालीय.

टोमॅटोच्या शिगेला पोहोचलेल्या किमतीमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. 20 ते 30 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो 150 रुपयांच्या पुढे गेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र अशात लखनऊ येथील बाजार समिती स्वस्तात टोमॅटो विकत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा टोमॅटो 75 रुपये किलोने विकला जात आहे.ट

टोमॅटो विकण्यासाठी नंबर नोट केला जातोय

यासाठी लखनऊमधील सीतापूर रोडवर असलेल्या नवीन गल्ला मंडईत सकाळी 10 ते दुपारी 4 अशी वेळ ठेवण्यात आली आहे. इथे प्रति व्यक्ती फक्त एक किलो टोमॅटो रोज घेऊ शकतो. खरेदी केल्यानंतर ग्राहकाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांकही नोंदवला जात आहे. यातून नक्कीच काहीसा दिलासा मिळाल्याचे सर्वसामान्यांनी सांगितले.

मुसळधार पाऊस शेतमालाला फटका

अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसाचा भाजीपाला उत्पादनावर वाईट परिणाम झाला. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्या महागल्या आहेत, मात्र टोमॅटोचे भाव सर्वाधिक भडकले आहेत. कमी उत्पादन आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने मागणीनुसार पुरवठा होत नाही.

Tomato Price
Tomato Price: काय सांगता! नाशकात टोमॅटो चक्क 30 रुपये किलो... या ठिकाणी या अन् घेवून जा

हॉटेल व्यावसायिकांची आव्हाने

लखनऊमधील ओपन एअर हॉटेलचे मालक उत्तम प्रकाश यांनी सांगितले की, आमच्यासमोर दुहेरी आव्हान आहे, एकीकडे आम्हाला महागड्या भाज्या विकत घ्यायच्या आहेत. मात्र ग्राहकाला जुन्या किमतीतच विक्री करावी लागते.

सॅलडमध्ये टोमॅटो आणि मिरच्यांचाच वापर जास्त केला जातो, कारण तुम्ही ते कमी केले तर ग्राहक दुसऱ्या हॉटेलमध्ये जातील. या परिस्थितीचा हॉटेल व्यावसायिकांनाही सामना करावा लागत आहे.

Tomato Price
Tomato Song Video : "जनता की लाल हुई है जब से हुआ..."; भाव वाढल्यानंतर टोमॅटोवर आलं गाणं

गृहिणींचे किचन बजेटही गडबडले

पावसामुळे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची मंडईतील आवकही कमी झाली आहे. टोमॅटोचे उत्पादन कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या वर्षी जानेवारीत एक ते दीड रुपये प्रतिकिलोचा भाव घसरला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडच केली नाही. (Price)

Tomato Price
Tomato Price: काय सांगता! नाशकात टोमॅटो चक्क 30 रुपये किलो... या ठिकाणी या अन् घेवून जा

मॅकडोनाल्डच्या बर्गरमधूनही टोमॅटो गायब झाले आहेत. अलीकडेच, कंपनीने आपल्या स्टोअरमध्ये नोटीस देऊन ही माहिती ग्राहकांना दिली होती. नोटीसमध्ये त्यांनी म्हटले होते की, सध्या त्यांच्या कोणत्याही वस्तूमध्ये टोमॅटोचा वापर केला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.