Tomato Price: एका महिन्यात टोमॅटोचे भाव 29 टक्क्यांनी कमी- मंत्रालय

देशात टोमॅटो आणि कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार उचलत आहे पाऊल
onion, tomato
onion, tomato Esakal
Updated on

देशात टोमॅटो आणि कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचे चांगले परिणाम सध्या दिसून येत आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने हा दावा केला आहे. गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या किमती २९ टक्क्यांनी खाली आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (Tomato Price)

टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत मागील महिन्याच्या तुलनेत 29 टक्क्यांनी कमी झाली आहे. बाजारातील आवक सुधारल्याने टोमॅटोच्या सरासरी भावात घट झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, मान्सूनच्या पावसामुळे भाजी मंडईमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बाजारातील कांद्याच्या किरकोळ किंमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. कांदा आणि टोमॅटो या भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या दोन महत्त्वाच्या भाज्या आहेत.

टोमॅटोचे दर एका महिन्यात 52 रुपये किलोवरून पोहोचले 37 रुपये किलोवर

मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (19 जुलै) टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 37.35 रुपये होती, जी एका महिन्यापूर्वी 52.5 रुपये प्रति किलो होती. त्याच वेळी, सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 25.78 रुपये प्रति किलो होती.

onion, tomato
‘नाफेड’कडून कांदा खरेदी बंद

सरकारने कांद्याची साठवणूक करून तयार केला बफर स्टॉक

सरकार कांद्याची साठवणूक करून बफर स्टॉक तयार करते. केंद्र सरकारने चालू वर्षात 2.50 लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टॉक आहे. या निर्णयामुळे 317.03 लाख टन कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, यंदा मंडईत भाव कोसळलेले नाहीत, असा सरकारचा विश्वास आहे. मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले आहे की, यावर्षी कांद्याचा हा बफर स्टॉक आॅगस्ट ते डिसेंबर या काळात बाजारात कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी वापरला जाईल. दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशातील मंडईंमध्ये कांद्याच्या दरात वेगवेगळ्या कारणांमुळे वाढ होत असते.

onion, tomato
कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल; कमी भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

देशातील कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार उचलत आहे हे पाऊल

ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले आहे की, कांद्याचा बफर स्टॉक खुल्या बाजारात विक्रीद्वारे पाठवला जाईल. ते राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांना किरकोळ दुकानांमध्ये पुरवठ्यासाठी दिले जाईल. सरकारने म्हटले आहे की, कांद्याचा बफर स्टॉक देशातील काही बाजारपेठांमध्ये वापरला जाईल जिथे गेल्या महिन्याच्या तुलनेत भाव वाढले आहेत. त्या भागातील प्रमुख मंडईंमध्ये कांद्याचा बफर स्टॉक वापरून कांद्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.

onion, tomato
कांदाभावात किलोला 50 पैसे ते रुपयाने घसरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.