संरक्षण क्षेत्रातील या 15 घडामोडींनी भारताला हसवलं आणि रडवलंही!

Top 15 Moments in Defense 2021: संरक्षणाच्या दृष्टीने यंदाच्या वर्षात भारतात (India) अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या.
Top 15 Moments in Defense  for India in 2021
Top 15 Moments in Defense for India in 2021Esakal
Updated on

Top 15 Moments in Defense 2021: लष्करीदृष्ट्या भारतासाठी 2021 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरलं. संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या घडामोडी यंदा घडल्या. 2021 मधील टॉप 15 घडामोडी आपण पाहणार आहोत.

1. सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat)-

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टरमधील सर्व 14 अधिकाऱ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

2. नौदलप्रमुख- आर हरिकुमार (Naval Chief - R. Harikumar)

व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरिकुमार यांची भारतीय नौदलाचे 25 वे नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. अ‍ॅडमिरल करमबीरसिंग हे 30 नोव्हेंबर 2021 निवृत्त झाले.

Top 15 Moments in Defense  for India in 2021
चीन-पाकवर 'प्रलय'चं सावट; भारताकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

3. हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी (Air Force Chief Vivek Ram Chaudhary)-

भारतीय हवाई दलाचे 27 वे प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची 21 सप्टेंबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्या निवृत्तीनंतर एअर चीफ मार्शलपदी विवेक राम चौधरी यांची निवड झाली.

4. अर्जुन रणगाडा (Arjun Tank)-

अत्याधुनिक अर्जुन रणागाडे 14 फेब्रुवारी 2021 रोजी लष्करात दाखल केले गेले. संरक्षण मंत्रालयाने अर्जुन मार्क-१ए या मुख्य युद्ध रणागाड्याच्या खरेदीला मान्यता दिली. याअंतर्गत ११८ रणगाडे खरेदी केले जाणार आहेत.

5. MH-60R हेलिकॉप्टर नौदलात दाखल-

भारतीय नौदलाने अमेरिकेतील लॉकहीड मार्टीन कंपनीकडून 2.4 अब्ज किंमतीची एकून 24 हेलिकॉप्टर खरेदी करार केला होता. त्यानुसार दोन MH-60R हेलिकॉप्टर नौदलात दाखल

6. निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Nirbhay missiles)-

Defense Research and Development organisation ने 24 जून 2021 रोजी ओडीशाच्या बालासोरमधील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITC) निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 1500 किमी पल्ल्याचं हे सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असून ते पारंपारिक तसेच आण्विक बॉम्ब वाहून नेऊ शकते.

Top 15 Moments in Defense  for India in 2021
भारताचा एक घाव, पाकचे दोन तुकडे; असा झाला बांग्लादेशचा जन्म

7. वर्धित पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी (Pinaka Rocketchi)-

DRDO नं जून 20210 मध्ये वर्धित पिनाका रॉकेटची ओडीशाच्या बालासोरमधील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITC) यशस्वी चाचणी घेतली. 44 सेकंदात 12 रॉकेट्स प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेलं पिनाका ही multiple rocket launcher प्रणाली आहे.

8. आयएनएस राजपूत निवृत्त (INS Rajput retired)-

भारतीय नौदलाची पहिली विनाशिका आयएनएस राजपूत 21 मे 2021 रोजी लष्करातून निवृत्त केले गेले. ऑपरेशन अमन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन क्रोजनेस्ट अशा मोहीमात त्याने महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती.

9. तेजसमध्ये स्वदेशी रडार (Indigenous radar in Tejas)-

हवाई दलामध्ये सामील होणाऱ्या 123 लढाऊ विमानांपैकी 51 विमानांवर स्वदेशी बनावटीचे उत्तम रडार बसवण्यात येणार आहेत.

10. आयएनएस करंज (INS Karanj)

आयएनएस करंज ही अत्याधुनिक पाणबुडी 10 मार्च 2021 रोजी नौदलात दाखल झाली. डिझेल आणि इलेक्ट्रीकल इंजिन असलेली 18 टॉर्पिडो आणि जहाजभेदी क्षेपणास्त्रांने ही पाणबुडी सज्ज आहे.

11. आयएनएस संध्यक निवृत्त (INS Sandhyak retired)

भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज आयएनएस संध्यक तब्बल 40 वर्षांच्या सेवेनंतर सेवामुक्त करण्यात आले.

Top 15 Moments in Defense  for India in 2021
Indian Navy Day: भारतीय नौदलाच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?

12. आकाश प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Akash Prime missile)-

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात मारा करू शकते.

13.आयएनएस विक्रांत (INS Vikrant)-

भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतच्या चाचणीला 4 ऑगस्ट 2021 पासून सुरूवात

14. एस 400 मिसायल (S400 missile)-

भारताने रशियाकडून S 400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली. त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षित होतील.

15. प्रलय क्षेपणास्त्र (Pralay missile)-

स्वदेशी बनावटीच्या प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची 22 डिसेंबर 2021रोजी सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी चाचणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()