ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉमध्ये रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे.
Luv Aggarwal Union Health Ministry
Luv Aggarwal Union Health Ministry
Updated on

नवी दिल्ली : जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे (Omicron Variant) जगभरात आतापर्यंत 115 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर भारतामध्ये (One Death Due To Omicron In India) आतापर्यंत एकाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे (Health Ministry) संयुक्त सचिव लव अग्रवाल (Luv Agrawal) यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी कोविड परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर, सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात सुधारणा केल्याचे सांगितले. (Total 115 Deaths Recorded In World Due To Omicron Variant )

दरम्यान, दक्षिण आफ्रिका, यूके, कॅनडा, डेन्मार्क मधील माहितीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉमध्ये (Hospitalization After Omicron Variant ) रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र, (maharashtra Corona Cases) पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगत ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात 22.39%, पश्चिम बंगाल 32.18%, दिल्ली 23.1% आणि उत्तर प्रदेशमध्ये 4.47 % रूग्ण संसर्ग दर नोंदविण्यात आला आहे. ( Corona Cases High In In 8 States Of India )

भारतात 12 जानेवारीपर्यंत 9,55,319 (Corona Cases Count In India) इतक्या कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जागतिक स्तरावरदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ दिसून आल्याचे अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. युरोपमधील आठ देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत संसर्ग होणाऱ्यांमध्ये 2 पटीने वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या आणि सलग तीन दिवस कोणतेही गंभीर लक्षणे दिसून न आल्यास अशा रूग्णांना 7 दिवसानंतर घरी सोडले जाईल. (Till Date Covid Deaths In India) रूग्णाची ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Support) सलग तीन दिवस ऑक्सिजन सपोर्टशिवाय 93 % वर नोंदविण्यात आल्यास अशा रूग्णांना घरी सोडण्यात येईल असे अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

लक्षणे असणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट (Corona Test) करणे आनिवार्य असणार आहे. तर लक्षणे (Corona Symptoms) नसलेल्यांची टेस्ट करण्याची गरज नाही, मात्र जर कुणाला इतर समस्या असल्यास त्यांची टेस्ट करणे अनिवार्य असल्याचे ICMR चे संचालक बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल म्हणाले की, ओमिक्रॉन ही सामान्य सर्दी नाही, ती कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी मास्क घालणे, लस घेणे गरजेचे आहे. औषधांच्या वापराबाबत तर्कशुद्ध दृष्टीकोन असायला हवा असे सांगत ते म्हणाले की, आम्ही औषधांच्या अतिवापर आणि गैरवापराबद्दल चिंतित आहोत.

Luv Aggarwal Union Health Ministry
योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवण्याची शक्यता

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1,94,720 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 442 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 60,405 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,60,70,510 झाली असून, त्यापैकी 9,55,319 इतके सक्रिय रूग्ण सध्या अस्तित्वात आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4,84,655 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या 4,868 इतकी नोंदविण्यात आली असून त्यापैकी 1,805 रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक बाधित रूग्ण महाराष्ट्रात असून याठिकाणी 1,281, राजस्थान 645, दिल्लीत 546, कर्नाटकात 479 आणि केरळमध्ये 350 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. (Omicron Cases In India)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.