नवी दिल्ली : पार्लमेंट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये ८७५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. यांपैकी २७१ जण राज्यसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (Total 875 people in Parliament House Complex are positive)
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी स्वतःला आठवड्याभरासाठी होम आयसोलेट करुन घेतलं आहे. तसेच जे कोणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांना कोरोनाची तपासणी करुन स्वतः आयसोलेशनमध्ये राहण्याची विनंतीही केली आहे.
दरम्यान, देशात आज ३,३३,५३३ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात सध्या २१,८७,२०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच देशाचा रोजचा पॉझिटिव्हीटी रेट हा १७.७८ टक्के आहे तर विकली पॉझिटिव्ही रेट १६.८७ टक्के आहे. तर रिकव्हरी रेट ९३.१८ टक्के आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.