केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर
Updated on

तिरुअनंतपुरम : एकीकडे देशात कोरोनाचं संकट धुमाकूळ घालतंय. दुसरी लाट ओसरून गेलेली असताना तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ठिकठिकाणच्या परिस्थितीनुसार, लॉकडाऊनच्या नियमांची तीव्रता ठरवण्यात आली आहे. म्हणावी तशी परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाहीये. असं असतानाच दुसरीकडे मात्र, आता एका नव्या व्हायरसने आपला दरवाजा ठोठावला आहे. केरळ राज्यामध्ये झिका या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास 14 जणांना या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जवळपास 13 संशयीत रुग्ण सापडले होते तर एकाला याची बाधा झालीच होती. या 13 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले होते. आणि 13 जणांनाही या विषाणूची बाधा झाल्याचं आता निष्पन्न झालं आहे.

केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर
'आप'ची नजर उत्तराखंडवर, मोफत वीजेच्या आश्वासनावर CM धामींचं केजरीवालांना उत्तर
केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

त्यामुळे केरळमधील आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या विभागाचं काम हाय अलर्टवर असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून काम केलं जात आहे. कोरोनाबाबत सुद्धा रुग्णसंख्या कमीतकमी आणि आवाक्यातच रहावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. अद्याप तरी ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे कुणी मृत पावल्याचं उदाहरण केरळमध्ये नसल्याचं केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सर्वांत आधी थिरुवअनंतपुरमच्या परसाला येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये या विषाणूची पुष्टी झाली होती. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. केरळच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली होती. या महिलेला ताप, डेकेदुखी आणि शरिराव लाल चट्टे उठल्याने तिला २८ जून रोजी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिने ७ जुलै रोजी बाळाला जन्मही दिला आहे. या महिलेने केरळ राज्याबाहेर प्रवासही केला नव्हता. पण तिचं घर हे केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. आठवड्याभरापूर्वी तिच्या आईला देखील अशीच लक्षणं होती.

केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर
पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे बनवली सोलर सायकल; बॅटरी संपली तरी 20 किमी धावणार

काय आहे हा विषाणू?

डासांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. युगांडामध्ये १९४७ साली सुरुवातीला माकडांमध्ये हा विषाणू आढळून आला होता त्यानंतर त्याचा माणसाला संसर्ग झाला. काही महिन्यांपूर्वी झिका विषाणूच्या संसर्गाचा ब्राझिलमध्ये उद्रेक झाला होता. या आजारामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असून त्यामुळे पॅरेलिसिस आणि मृ्त्यूही ओढवल्याची उदाहरणं आहेत, असं जागतीक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

भारतात यापूर्वीही आढळले होते रुग्ण

भारतात २०१८ मध्ये जयपूर येथे झिका विषाणूचे ८० रुग्ण आढळले होते. हा भारतातील या विषाणूच्या संसर्गाचा पहिलाच मोठा उद्रेक होता. त्यानंतर आता केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने काळजी भर पडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.