Firecrackers Ban : 'ही' दुर्घटना घडताच सण, उत्सवात आता फटाके फोडण्यावर असणार बंदी; मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण आदेश

सरकार राजकीय समारंभ, फेरी, मिरवणुका, धार्मिक मेळे, विवाह समारंभात फटाके फोडण्यावर बंदी घालत आहे.
Firecrackers Banned
Firecrackers Bannedesakal
Updated on
Summary

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त ग्रीन फटाके विकली जावीत.

बंगळूर : सुरक्षा उपायांची घोषणा करताना मिरवणूक आणि विवाहादरम्यान पारंपरिक फटाके (Firecrackers) फोडण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी मंगळवारी दिले. त्याऐवजी हरित फटाके (ग्रीन) फोडण्याचा त्यांनी सल्ला दिला.

सात ऑक्टोबरला बंगळूरच्या दक्षिणेकडील कर्नाटक-तमिळनाडू सीमेजवळ अत्तिबेले येथे फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत १४ जण ठार आणि चौघे जखमी झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली.

Firecrackers Banned
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळणार? 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी; पडळकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त ग्रीन फटाके विकली जावीत. सरकार राजकीय समारंभ, फेरी, मिरवणुका, धार्मिक मेळे, विवाह समारंभात फटाके फोडण्यावर बंदी घालत आहे. या बंदीचे उल्लंघन झाले, तर अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातील. मात्र हिरव्या फटाक्यांना परवानगी आहे.

Firecrackers Banned
Airline Service : बड्या लोकांसाठी आनंदाची बातमी! आता कोल्हापूर-मुंबई विमानात असणार 'बिझनेस क्लास'; कधीपासून सेवा सुरु?

तीन अधिकारी निलंबित

अत्तिबेले येथील तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश दिले. उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावणार आहेत, असे सिद्धरामय्या म्हणाले.

अत्तिबेले प्रकरणात रामस्वामी रेड्डी याने फटाक्यांच्या विक्रीचा परवाना मिळवला होता. त्याच्याकडे गोदामाचा परवाना नव्हता. १,००० किलो फटाके विक्रीला परवानगी दिली. मात्र त्याने गोदामात ७,०००-८,००० किलो ठेवले होते, असे सिद्धरामय्या म्हणाले.

Firecrackers Banned
Ambabai Temple : चप्पल स्टॅंड हटण्यावरून अंबाबाई मंदिराशेजारी मोठा राडा; काय आहे प्रकरण, पोलिसांनी का केला बळाचा वापर?

वारसदारांना पाच लाखांची मदत

अत्तिबेले दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची भरपाई आणि चौघा जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा सरकारने केली आहे. तेथे काम करणारे बहुतेक विद्यार्थी होते, ते सर्व तामिळनाडूचे होते. ते ६०० रुपये रोजंदारीवर कामावर आले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.