Train accidents in India: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांच्या कारकिर्दीत झालेत भीषण अपघात! राजीनाम्याची सतत मागणी, मात्र....

Train accidents in India : जून २०२३ मध्ये देश हादरला तो करोमंडल एक्सप्रेसच्या अपघातामुळे..अनेकांचे मृतदेत देखील पटवण्यात यश आले नव्हते. मृतदेहांचा मोठा खच लागला होता. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली होती.
Train accidents in India
Train accidents in India esakal
Updated on

Train accidents in India :  पश्चिम बंगालमध्ये भरधाव वेगात असलेल्या कांचनजंघा एक्स्प्रेसला एका मालगाडीने धडक दिल्याने रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर ट्रेन सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ ही टक्कर झाली. या धडकेमुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान घडलेल्या घटनेला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात मोठी वाढ झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कारकि‍र्दीत झालेले भीषण अपघातांची माहिती घेऊया.

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस अपघात -

जून २०२३ मध्ये देश हादरला तो करोमंडल एक्सप्रेसच्या अपघातामुळे..अनेकांचे मृतदेत देखील पटवण्यात यश आले नव्हते. मृतदेहांचा मोठा खच लागला होता.  यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली होती. ओडिशामध्ये शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, हा सर्वात मोठा अपघात होता.  2 जून 2023 रोजी, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि ओडिशातील मालगाडी दरम्यान झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातात 290 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक लोक जखमी झाले. भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी हा एक अपघात होता.

आंध्र प्रदेश रेल्वेची धडक-

29 ऑक्टोबर 2023 रोजी, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या ट्रेनच्या धडकेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी ट्रेन सिग्नलच्या पलीकडे गेल्याने हा अपघात झाला.

बिहार नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली-

11 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री बिहारमधील बक्सरमधील रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ 12506 आनंद विहार टर्मिनल-कामाख्या जंक्शन नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले होते, त्यात चार जण ठार झाले होते. तर 70 हून अधिक जण जखमी होते.

लखनौ-रामेश्वरम भारत गौरव ट्रेनला आग

25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5.15 वाजता मदुराई जंक्शनजवळ थांबलेल्या लखनौ-रामेश्वरम भारत गौरव ट्रेनला आग लागून नऊ प्रवासी मरण पावले आणि 20 जण जखमी झाले होते. प्राथमिक तपासानुसार आग लागली तेव्हा प्रवाशांनी ट्रेनमध्ये गॅस सिलिंडर पेटवून डब्यात अन्न शिजवल्याचे समोर आले होते.

बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस अपघात-

13 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील अलिपूरद्वार भागात बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेसचे किमान 12 डबे रुळावरून घसरले होते, त्यात नऊ जण ठार आणि 36 जण जखमी झाले होते.

Train accidents in India
Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले-

मे 2024 मध्ये मुंबईजवळ मोठा रेल्वे अपघात टळला होता. सायंकाळी पाच वाजता मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. मात्र, यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मात्र मुंबई-गुजरात दरम्यानच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा मोठा अपघात -

एप्रिल 2022 मध्ये 15 तारखेला रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला होता. गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा अपघात झाला. यामध्य पॉंडीचेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वे रुळावरून घसरले होते.

दादर-माटुंगादरम्यान झालेल्या हा रेल्वे अपघात ट्रॅक बदलताना दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने झाला. अपघातादरम्यान इंजिनजवळ आग देखील लागल्याचे समोर आले. यानंतर सीएसटीच्या दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. आपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही असे, मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले होते.

कुमंदीह स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात -

दोन दिवसांपूर्वी धनबाद विभागातील कुमंदीह स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रांची सासाराम इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेवरून काही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या आणि पलीकडून येणाऱ्या मालगाडीची धडक बसली. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना लातेहार जिल्ह्यातील हेहेगडा कुमंदीह रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे तर एक बालक जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १८६३५ रांची-सासाराम एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेवर या मार्गावरून जात होती. लातेहार स्टेशन पार केल्यानंतर ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. तोपर्यंत ट्रेन कुमंदीह रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. आगीच्या वृत्ताने ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. ट्रेन गेटजवळ उभ्या असलेल्या लोकांना आपला जीव वाचवायचा होता आणि त्यांनी ट्रेनमधून उडी मारली. दरम्यान, डाऊन मार्गावरून येणाऱ्या मालगाडीने प्रवाशांना धडक दिली.

Train accidents in India
Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, 5 प्रवाशांचा घटनेत मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.