Train Derailed: Howara-CSMT एक्स्प्रेस ट्रेनचे 18 डब्बे रुळावरून घसरले! दोघांचा मृत्यू, 25 जण जखमी

Howara CSMT Express Train Derailed from track: मिळालेल्या माहितीनुसार, सहाजण अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Howara CSMT Express Train
Howara CSMT Express Train
Updated on

Howara-CSMT Express Train: हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला आहे. चक्रधरपूरजवळ ट्रेन रुळावरून घसरली आहे. ARME आणि ADRM CKP पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर २५ जण अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Howara CSMT Express Train
Thane News: रिक्षा चालकाशी वाद जीवावर बेतला; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12810 (हावरा-सीएसएमटी एक्स्प्रेस) झारखंडच्या चक्रधरपूर विभागाच्या राजखरस्वन वेस्ट आउटर आणि बाराबांबू दरम्यान रुळावरून घसरली आहे. सकाळी ३.४५ वाजता ही घटना घडली आहे. रेल्वे कर्मचारी आणि इतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्यानंतर ते दुसऱ्या रुळावरील मालगाडीला धडकले. या अपघातामध्ये आतापर्यंत २५ जण जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना चक्रधरपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

Howara CSMT Express Train
Ganpati special train booking: गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, चाकरमान्यांचा हिरमोड, तिकीट बुकिंगमध्ये गैरप्रकार?

अपघाताचे काही फोटो समोर आले आहे. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. जवळपास १० डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.