Transgender Pregnency : ट्रान्सजेंडर व्यक्ती कशी बनली प्रेग्नंट? जाणून घ्या गर्भ प्रत्यारोपण ऑपरेशन काय ते

केरळ येथील कोझिकोड येथे देशातील पहिल्या तृतीयपंथी जोडप्याला बाळ होणार
Transgender Pregnency
Transgender Pregnencyesakal
Updated on

Transgender Pregnency : केरळ येथील कोझिकोड येथे देशातील पहिल्या तृतीयपंथी जोडप्याला बाळ होणार आहे. विशेष म्हणजे या जोडप्यातील ट्रान्सपुरूष गरोदर असून जहाद पावल असं त्याचं नाव आहे. यासंबंधीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Transgender Pregnency
Travel Tips : "व्हिजा मिळवून देणारे देव" परदेशी जाणारे लोक या मंदिरात करतात नवस

अधिक माहितीनुसार, ट्रान्स पुरूष जहाद पावल आणि ट्रान्सवुमन झिया हे मागच्या तीन वर्षापासून एकत्र राहतात. तर त्यातील जहाद आता गरोदर असून तो गरोदर होणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरूष आहे असं त्याची पार्टनर झिया यांनी सांगितलं. तर बाळासाठी जहादची स्त्रीपासून पुरुषात बदलण्याची प्रक्रिया काही दिवस रखडली होती. काय असते ही प्रक्रिया हेच आज जाणून घेऊ

Transgender Pregnency
World Cancer Day : लूकची पर्वा न करता कँसर पेशंट्ससाठी सेलिब्रीटीजने केलं हे मोठं काँप्रमाइज

जहाद स्त्री होती पण नंतर तो पुरुष झाला, तेव्हा त्याचे स्तन काढून टाकण्यात आले. पण त्याच्या शरीरात गर्भपिशवी कायम होती. याचवेळी या जोडप्याला आपल्याला बाळ पाहिजे अशी इच्छा झाली.त्यामुळे मग जहादने त्याची ट्रांझिशन प्रक्रिया थांबवली आणि आई होण्याचा निर्णय घेतला. झिया आणि जहाद यांचं हे बाळ जन्माला येण्यापूर्वी आणि नंतरही अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. पण तरीही त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला.

Transgender Pregnency
Travel Tips : आंध्रप्रदेशची नवी राजधानी आहे City of Destination, असा करा ट्रीपचा प्लॅन

या बाळाचा जन्म सिझरियन शस्त्रक्रियेने होईल की नैसर्गिक?

अर्थातच आता नैसर्गिक पद्धतीने बाळाचा जन्म होणं शक्य नाही. त्यामुळं बाळाचा जन्म सिझरियन शस्त्रक्रियेनेच होईल हीच आता एक शक्यता आहे.जहादचे स्तन हे ट्रान्सजेंडर होताना, म्हणजे स्त्रीमधून पुरुष होताना काढून टाकण्यात आले. त्यामूळे बाळाला आईचं दूध कसं देणार हा आणखी एक प्रश्न उभा राहणार आहे.पण मदर मिल्क बँकमधून ही गरज पूर्ण करता येऊ शकते. मेडिकल कॉलेजमध्ये मिळणाऱ्या ब्रेस्ट मिल्क बँकेतून या बाळाला दूध देण्याचा या जोडप्याचा प्रयत्न असणार आहे.

Transgender Pregnency
Child Health : मूल जन्मल्यानंतर ५ दिवसांच्या आत करून घ्या ही तपासणी; नाहीतर होतील गंभीर आजार

स्थानिक माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार या जोडप्यानं आधी बाळाला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीही तपासल्या होत्या आणि त्यानुसार त्यांनी प्लानिंगसुद्धा सुरू केलं होतं. पण एक ट्रान्सकपल असल्यामुळे त्यांना असं करण्यात अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यांनी मुलाला जन्म देण्याचाच निर्णय घेतला. भारतात ट्रान्समॅनने बाळाला जन्म देण्याची घटना असं म्हटलं जात असलं, तरी नैसर्गीक प्रयत्नांतूनच हे बाळ जन्माला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.