ओमिक्रॉनची धास्ती! महाराष्ट्रासह चार राज्यांनी लागू केले प्रवास निर्बंध

Airport
AirportGoogle
Updated on

भारतात ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी ही संख्या 578 वर पोहोचली होती. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 578 रुग्ण आढळले असून दिल्लीत(Delhi) सर्वाधिक 142 रुग्णसंख्या नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र(Maharashtra) 141, केरळ(Kerala) 57, गुजरात( gujrat) 49, राजस्थान (rajasthan) 43 आणि तेलंगणा ( Telangana ) 41 रुग्ण संख्या आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते महाराष्ट्र कोण कोणत्या राज्यात सरकाने(State Goverment)) प्रवासासाठी निर्बंध लागू केले आहेत हे जाणून घेऊ या...(Travel restrictions imposed by states amid Omicron scare)

Airport
'मोदी, योगीजी मरण्यापूर्वी तुम्ही जिवंत राहाल का?'

दिल्ली (Delhi)

ओमिक्रॉनच्या भीतीमुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Union Ministry of Civil Aviation) शुक्रवारी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोविड-19 रुग्णांची संख्या वाढलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी रँडम सँपल कलेक्शन (random sample collection) केले जाईल. प्रवाशांचे सँपल गोळा केल्यानंतरच त्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांच्या आगमनावेळी देखील सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग(Thermal screening) देखील केले जाईल. जर कोणी कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करत असेल आणि ट्रांझिट स्टेशनमध्ये विमानतळ सोडत नसेल, तर त्यांच्यासाठी फायनल डेस्टिनेशन (guidelines of the final destination)मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील.

पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांना 10 दिवसांसाठी घरी किंवा कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जाईल. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी ऑनलाइन हवाई सुविधा पोर्टलवर (online Air Suvidha portal) स्व-घोषणापत्र सादर करावे. त्यांना Covid-19 RT-PCR रिपोर्ट जर निगेटिव्ह असेल तरी देखील अपलोड करणे आवश्यक आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासांच्या आत टेस्ट करणे आवश्यक आहे. रिस्क असलेल्या देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअरलाइन्सद्वारे कळवले जाईल की. त्यांना आगमनानंतरची टेस्ट केली जाईल आणि टेस्ट निगेटिव्ह असला तरी त्यांना थेट क्वारंटाईन केले जाईल. आगमनानंतर प्रवासी नमुने सादर करू शकतात. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरी त्यांना 7-दिवस क्वारंटाईन करणे अनिवार्य असेल. आणि 8व्या दिवशी त्यांची पुन्हा टेस्ट केली जाईल. त्यांची पुन्हा टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना आणखी ७ दिवस स्वत:चे निरीक्षण करावे लागले.

रिस्क नसलेल्या देशांतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जाईल आणि 14 दिवस त्यांना आरोग्याचे स्वत:च निरीक्षण करावे लागले.

Airport
चक्क माणूस गाढवावर करु लागला मुलासारखं 'प्रेम'; बाटलीतून पाजतो दूध अन्..

महाराष्ट्र (Maharashtra)

हाय- रिस्क(High-risk)असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डान करणाऱ्यांना संबधित आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आगमन झाल्यावर RT-PCR चाचण्या कराव्या लागतील आणि सातव्या दिवशी दुसऱ्या टेस्टसह 7-दिवस अनिवार्य “संस्थात्मक विलगीकरण”करणे आवश्यक आहे. कोणत्याही चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला/तिला कोविड-19 उपचार सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवले जाईल. टेस्टचा निकाल निगेटिव्ह आला तरी प्रवाशाला आणखी ७ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागेल.

देशांतर्गत विमान प्रवाशांच्या बाबतीत, प्रवाशांना एकतर पूर्णपणे लसीकरण करावे लागेल किंवा RT-PCR निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल जे 72 तासांपेक्षा जुने नसावे.

Airport
अमेरिका ते भारत, डेल्टाचं थैमान ते ऑलिम्पिकचं मैदान; जगातील मोठ्या घटना

मुंबई (Mumbai)

मुंबई सिव्हीक बॉडीने(Mumbai civic body)शुक्रवारी दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवसांचे ‘होम क्वारंटाईन’ अनिवार्य केले आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दुबईहून येणारे सर्व प्रवासी, जे मुंबईचे रहिवासी आहेत, त्यांना अनिवार्यपणे सात दिवस होम क्वारंटाईन करावे लागेल.

जर त्यांना पूर्ण लसीकरण केले असेल तर आगमन झाल्यावर RT-PCR टेस्टची गरज भासणार नाही. नागरी संस्थेने सांगितले की, वॉर्ड वॉर रूम सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या प्रवाशांशी संपर्क साधेल आणि सातव्या दिवशी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.टेस्ट निगेटिव्ह असेल तरी प्रवाशाला आणखी सात दिवस स्वत:चे निरीक्षण करावे लागेल. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास, आंतरराष्ट्रीय प्रवाशासाठी सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना संस्थात्मक विलगीकरणासाठी हलवले जाईल," बीएमसी(BMC)ने सांगितले.

Airport
भारतात आणखी दोन कोविड लसींसह अँटी-व्हायरल औषधाला मंजुरी

पश्चिम बंगाल (West Bengal)

इतर राज्यांतील प्रवाशांचा 72 तासांपूर्वी केलेल्या RT-PCR टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन-ग्रस्त देशांतून राज्यात येणाऱ्यांचे सात दिवस विलगीकरण केले जाईल.

सरकारी संचालित बेलेघाटा आयडी हॉस्पिटलमध्ये (Beleghata ID Hospital)आलेल्या, विशेषत: ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह रुग्णांसाठी, विशेष वॉर्ड तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कर्नाटक (Karnataka)

राज्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अनिवार्यपणे RT-PCR चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास, नमुना जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी (genomic sequencing) पाठविला जाईल आणि त्यांचे विलगीकरण केले जाईल. ओमिक्रॉन व्हेरिअंटसाठी जीनोमिक सिक्वेन्सिंग निगेटिव्ह असल्यास उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.

"रिस्क'' म्हणून यादीत समाविष्ट असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी,निगेटिव्ह रिझल्टअसलेल्या 5 टक्के प्रवाश्यांचे आगमनानंतर रँडम सॅपल (random) घेऊन sample) RT-PCR टेस्ट केली जाईल.

Airport
नवीन आर्थिक वर्षात 15 मिनिटे जास्त काम केल्यास मिळणार ओव्हरटाईम?

जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir)

काश्मीरला जाणाऱ्या परदेशी व्यक्तींना(Foreigners)विमानतळावर RT-PCR चाचण्या कराव्या लागतील. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतील त्यांना विलगीकरण कक्षात हलवले जाईल आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांची टेस्ट केली जाईल.

रिस्क असलेल्या देशांतील लोकांना मात्र टेस्ट निगेटिव्ह असेल तरीही सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. 8 व्या दिवशी त्यांची पुन्हा टेस्ट केली जाईल आणि निगेटिव्ह असल्यास, कमीतकमी दोन आठवडे स्व-निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जाईल.

इतर देशांतील प्रवाशांना किमान दोन आठवडे स्वतःचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यास सांगितले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()