सोनारपूर (पश्चिम बंगाल) - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल इंधनदरवाढीच्या विरोधात ई-स्कूटरवरुन प्रवास केलेला असताना आज त्यास प्रत्त्युत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी मैदानात उतरल्या. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान इराणी यांनी चोवीस परगना जिल्ह्यातील सोनारपूर येथे रोड शो केला. यावेळी त्यांनी स्कूटीवरुन २५ किलोमीटरचे अंतर पार केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भाजपकडून राज्यात परिवर्तन यात्रा सुरु असून त्याचाच एक भाग म्हणजे भाजप खासदार रुपा गांगुली आणि अग्निमित्र पॉल यांनी गारियाजवळील गंजगाजोरा येथे रथयात्रेचे आयोजन केले होते. यात केंद्रीय मंत्री स्मृति इराणी सहभागी झाल्या होत्या. थोडावेळ्यानंतर इराणी रथावरुन उतरल्या आणि स्कूटर हातात घेली. यावेळी त्यांनी हेल्मेटही घातले. त्या म्हणाल्या, की सकाळी रथयात्रा सुरू होण्यास प्रशासनामुळे विलंब झाला. यात्रा अडवली तरी आम्ही दूचाकी चालवू, पायी चालू. कारण पश्चिम बंगाल आता बदलाच्या दिशेने निघाला आहे. इराणी यांनी स्कूटी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. यावेळी जय श्रीराम, खेल होबे (सामना होणारच) अशा घोषणा देण्यात आल्या.
ममता दीदींचा काळ संपला: इराणी
परिवर्तन यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. त्या म्हणाल्या, तुमचा काळ आता संपला आहे. तुमच्या काळात बंगालमध्ये केवळ हिंसाचार झाला. या ठिकाणी लोकशाही संपली, लोकांचा आवाज दाबला. आता तीच जनता तुम्हाला हरवण्याचे काम करेल आणि कमळ बहरेल. तृणमूल कॉंग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना लागू केल्या नाहीत. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंगालचा विकास ठप्प झाला आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त हिंसा वाढली, असे इराणी म्हणाल्या.
भाजपच्या सूचनेनुसार निवडणूक आयोग बंगाल विधानसभेचे मतदान आठ टप्प्यात घेत आहे. मात्र त्याचा कोणताही फायदा भाजपला मिळणार नाही. तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत एका टप्प्यात मतदान होत असताना बंगालमध्ये ८ टप्प्यात कशासाठी?
- ममता बॅनर्जी , मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Edited By - Prashant Patil
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.