Trend Of Wearing Black : निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे घालण्याचा ट्रेंड कधी आणि कसा सुरू झाला?

मणिपूरच्या मुद्दय़ावरून गुरुवारी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही संसदेतील कोंडी कायम
 Trend Of Wearing Black
Trend Of Wearing Blackesakal
Updated on

Trend Of Wearing Black : मणिपूरच्या मुद्दय़ावरून गुरुवारी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही संसदेतील कोंडी कायम राहिली. संसदेत ‘इंडिया’च्या सदस्यांनी काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध केला. पण निषेधाच्या नावाखाली फक्त काळे कपडेच का घातले जातात याचा कधी विचार केलाय का? वास्तविक निषेध म्हणून काळे कपडे वापरण्याचा इतिहास फार जुना आहे. याची सुरुवात पाहायला गेलं तर प्युरिटन्स लोकांनी 16 व्या आणि 17 व्या शतकापासून असे कपडे घालायचा पायंडा पाडला.

हा एक धार्मिक समुदाय होता. त्यांनी आपली एकता आणि बांधिलकी दर्शविण्यासाठी धार्मिक श्रद्धा असलेले काळे कपडे घालण्यास सुरुवात केली. ही परंपरा 20 व्या शतकातही चालू राहिली आणि युनायटेड स्टेट्समधील नागरी हक्क चळवळीदरम्यान निदर्शकांनी निषेधाचा रंग म्हणून काळा रंग निवडला.

 Trend Of Wearing Black
Pune Vehicles Speed : पुण्यातील वाहनांचा प्रतितास वेग किती? याची अद्ययावत माहिती पर्यावरण विभागाकडे नाही

निषेधाचा रंग काळा का?

जगाच्या इतिहासात काळा रंग हे दुःख आणि निषेधाचं प्रतीक मानलं गेलंय. 1921 मध्ये एलेन कॉन्रॉय मॅककॅफ्रे यांनी 'द सिम्बोलिझम ऑफ कलर' या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. प्रकाश शोषून घेतो म्हणून विज्ञान काळया रंगाचा स्वीकार करत नाही असं त्यांनी लिहिलं आहे. पाश्चिमात्य लोक काळ्या रंगाला शोक आणि दुःखाचं प्रतीक मानतात असंही या पुस्तकात नमूद केलं आहे. काळा रंग हा शारीरिक आणि मानसिक तसेच नैतिकदृष्ट्या निराश करणारा असतो, असा समज हळूहळू निर्माण झाला.

 Trend Of Wearing Black
Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या नाशिकच्या तरुणाची आत्महत्या; घटनेने खळबळ

नकारात्मकतेला पर्याय

एलेन कॉन्रॉय मॅककॅफ्रे लिहितात की काळया रंगाचा वापर रात्र, खोली किंवा अंधार दर्शवण्यासाठी केला जातोम्हणूनच तो नकारात्मकतेसाठी समानार्थी शब्द बनला आहे. हळूहळू तो सामान्य जीवनाचा भाग बनला आणि काळी यादी, काळा दिवस, काळा पैसा असे शब्द नकारात्मकता दाखवू लागले.

 Trend Of Wearing Black
Pune: वाहनांच्या संख्येत चार वर्षांत आठ लाखांनी वाढ झाली; मात्र तरी ताशी वेग १८ किमीच, अहवालात काय सांगितले ?

त्याच्या नकारात्मकतेमुळे, काळ्या रंगात निषेध करण्याची आश्चर्यकारक क्षमता आहे. त्यामुळेच त्याचा मानसशास्त्रीयदृष्ट्या इतका प्रभाव पडतो की कोणी हातावर काळी पट्टी बांधली तरी ते निषेधाचं प्रतीक मानलं जातं.

 Trend Of Wearing Black
Fashion Tips : जीन्स विकत घेताना या 4 गोष्टींची काळजी घ्या, मिळेल परफेक्ट फिगर अन् शेप

काळा रंग धार्मिक दृष्ट्याही निषिद्ध आहे

भारतीय परंपरेनुसार पाहिलं तर काळा रंग धार्मिक दृष्ट्याही निषिद्ध मानला जातो. पूजापाठ असो की लग्नसोहळा, काळ्या रंगाचे कपडे नेहमीच निषिद्ध मानले गेले आहेत. मात्र, काळा रंग केवळ नकारात्मकतेसाठी वापरला गेला आहे, असं नाही. प्राचीन इजिप्तमध्ये काळा रंग चांगल्या कापणीचं प्रतीक मानला जात असे, कारण नाईल नदीच्या काळ्या मातीमुळे पिकांची वाढ चांगली होते.

 Trend Of Wearing Black
Kareena's Health Tips : हेल्दी राहण्यासाठी बेबो रोज रात्री न विसरता हा पदार्थ टाकून पिते दूध

आंदोलनात काळा रंग हे निषेधाचं वैशिष्ट्य ठरलं

नागरी हक्क चळवळ: अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी एकता आणि वचनबद्धता दर्शविण्यासाठी काळे कपडे घातले होते. आंदोलनात झालेल्या जीवित व मालमत्तेच्या हानी संदर्भात शोक व्यक्त करण्यासाठी काळ्या कपड्यांचाही वापर करण्यात आला.

 Trend Of Wearing Black
Pune Crime: शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

वर्णद्वेष युग : दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाच्या आंदोलनादरम्यानही काळे कपडे घालूनच निषेध व्यक्त केला जात होता.

अरब स्प्रिंग : अरब स्प्रिंग बंडातही आंदोलकांनी काळे कपडे घालून निषेध केला.

ब्लॅक लाइव्ह्स मॅटर आंदोलन : या आंदोलनादरम्यानही आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.