पती-पत्नीच्या भांडणात कुटूंबाचं नुकसान होतं हे ब-याचदा पाहण्यात आले आहे, पण पती-पत्नीच्या भांडणामुळे रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पतीला आपली नोकरी गमवावाली लागली आहे म्हणजे रेल्वेने त्याला सस्पेंड केले आहे. पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आता पतीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला आहे. 'ओके' या एका शब्दामुळे हे एवढे मोठे प्रकरण घडले.