VIDEO : भाजपमध्ये गेल्याची एवढी मोठी शिक्षा? तीन महिलांनी घातलं 'दंडवत' अन् 'या' पक्षात केला प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये तीन महिला दंडवत घालत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय.
Dandavat Parikrama
Dandavat Parikramaesakal
Updated on
Summary

तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) हा नेहमीच आदिवासी विरोधी पक्ष राहिला आहे. तृणमूल काँग्रेसनं या तीन आदिवासी महिलांशी जे केलं, तो आदिवासींचा अपमान आहे.

पश्चिम बंगालमध्ये तीन महिला दंडवत घालत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. तीन आदिवासी महिलांनी आधी रस्त्यावरुन दंडवत घातलं आणि त्यानंतर त्या टीएमसीमध्ये दाखल झाल्या.

या प्रकरणावरून सध्या वाद सुरू झालाय. भाजपमध्ये (BJP) सामील झाल्याची शिक्षा म्हणून टीएमसीनं या महिलांना जाहीरपणे दंडवत घालून पक्षात प्रवेश करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बालूरघाट येथील तपनची आहे. इथं तीन महिलांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत दंडवत घातलं. त्यानंतर त्यांनी टीएमसीमध्ये (TMC) प्रवेश केला. रस्त्याच्या मधोमध या महिला दंडवत घालताना दिसत आहेत. या प्रकरणात टीएमसीचं म्हणणं आहे की, 'या महिलांनी प्रायश्चित्त म्हणून हे सगळं केलं आहे.'

Dandavat Parikrama
Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस जिंकणार की हरणार? शरद पवारांचं मोठं भाकीत

याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी सांगितलं की, 'या तिन्ही महिलांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या महिलांना पुन्हा टीएमसीमध्ये परतायचं होतं, यासाठी त्यांना दंडवत घालावं लागलं. याबाबत भाजप महिला आयोगाकडं या प्रकरणाची तक्रार करण्याचा विचार करत आहे.'

Dandavat Parikrama
China Taiwan Conflict : चीन-तैवान संघर्ष पेटला! 40 चिनी लढाऊ विमानं घुसली तैवानच्या हद्दीत

मजुमदार पुढं म्हणाले, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) हा नेहमीच आदिवासी विरोधी पक्ष राहिला आहे. तृणमूल काँग्रेसनं या तीन आदिवासी महिलांशी जे केलं, तो आदिवासींचा अपमान आहे. मी आदिवासी समाजाला या प्रकरणाबाबत तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याचं आवाहन करतो. तृणमूल काँग्रेसनं आदिवासी महिलांशी जे केलं, त्याचा बदला आदिवासी समाजानं लोकशाही मार्गानं घेतला पाहिजे. याआधीही तृणमूल काँग्रेसनं द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्यास विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.