Independence Day: छत्तीसगडच्या 6 गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फडकणार तिरंगा, जाणून घ्या कारण

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच गावांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे
National Flag Tiranga
National Flag TirangaEsakal
Updated on

बस्तर विभागातील सात जिल्ह्यांपैकी सुकमा आणि विजापूर हे जिल्हे आहेत, जे गेल्या तीन दशकांपासून नक्षलवाद्यांचा सामना करत आहेत. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागातील सहा दुर्गम गावांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. या गावांजवळ सुरक्षा दलांनी नवीन छावण्या उभारल्याने येथील विकासाचा मार्ग मोकळा होत असल्याचे ते म्हणाले.

पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी पीटीआयला सांगितले की, "मंगळवारी, विजापूर जिल्ह्यातील चिन्नागेलूर, टाइमनार आणि हिरोली गावांमध्ये आणि सुकमा जिल्ह्यातील बेद्रे, दुब्बमर्का आणि तोंडामार्का गावात पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकवला जाईल."

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच गावांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. याशिवाय, सुकमा जिल्ह्यातील पिडमेल, दुब्बकोंटा, सिल्गर आणि कुंदेड गावातही आज पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे, जिथे यावर्षी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला होता.

National Flag Tiranga
Independence Day: फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ, 15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांनी असा केला होता जल्लोष

"या गावांजवळ नवीन छावण्या उभारल्याने नक्षलवाद्यांना (स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी) काळे झेंडे फडकवण्याच्या घटना घडत नाहीत. आता या भागात तिरंगा फडकवला जाईल, " असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ते म्हणाले की, नवीन शिबिरांच्या स्थापनेमुळे सरकारी कल्याणकारी योजना लोकांपर्यंत, प्रामुख्याने आदिवासींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे आणि या भागांमध्ये विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे.

National Flag Tiranga
Independence Day in Kashmir : श्रीनगर येथील लाल चौकात नागरिकांनी फडकवले तिरंगा ध्वज

मुख्यमंत्री फडकवणार तिरंगा

येथील एका सरकारी जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने राजधानी रायपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिनाची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल सकाळी रायपूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर तिरंगा फडकवतील आणि सुरक्षा दलाच्या विविध तुकड्या गार्ड ऑफ ऑनर स्वीकारतील अशी माहिती त्यांनी दिली.

National Flag Tiranga
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी आपले घर आणि ऑफिस सजवा या सुंदर रांगोळीने, पाहा सुंदर डिझाइन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()