Trinamool Congress : तृणमूल काँग्रेस आक्रमक; भाजप खासदाराच्या ‘व्हिडिओ’मुळे राजकारण तापले
कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची खिल्ली उडविविणाऱ्या भाजप खासदार दिलीप घोष यांच्या कथित व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या व्हिडिओवर तिखट प्रतिक्रिया देत तृणमूल काँग्रेसने घोष यांच्या वक्तव्यातून भाजपचा ‘डीएनए’ प्रतिबिंबित होत असल्याचे म्हटले आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले घोष राज्यातील वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
तृणमलने शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये खासदार घोष ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध वक्तव्ये करताना दिसतात. ‘बंगालला स्वत:ची मुलगी हवीय,’ या तृणमूल काँग्रेसच्या २०२१च्या घोषणेची खिल्ली करत घोष यांनी म्हटले आहे, की त्या (ममता बॅनर्जी) गोव्याला गेल्यावर मी गोव्याची मुलगी आहे, असे सांगतात. त्रिपुरात मी त्रिपुराची मुलगी असल्याचे सांगतात. त्यांनी आधी याबाबत स्पष्ट तरी करावे, असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, या व्हिडिओची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.
या वक्तव्याविरुद्ध तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगालच्या महिला व बालविकास मंत्री शशी पांजा यांनीही घोष यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की दिलीप घोष हा राजकीय नेतृत्वाच्या नावावरील कलंक आहेत. माँ दुर्गेच्या वंशाला आव्हान देण्यापासून श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या वंशावळीला प्रश्न विचारण्यातून त्यांची नैतिक दिवाळखोरी दिसून येत आहे. एक गोष्ट मात्र आता स्फटिकाइतकी स्पष्ट आहे, ती म्हणजे घोष यांना बंगालच्या महिलांबद्दल अजिबात आदर नाही. मग ती हिंदू धर्मातील देवी असो किंवा सध्या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री असेल्या ममता बॅनर्जी असोत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.