Tripura Assembly election : सरकारी कर्मचाऱ्यांचा वर्षातून दोनदा डीए वाढवू

डाव्या आघाडीचा त्रिपुरासाठी जाहीरनामा प्रसिद्ध
Tripura Assembly election DA of government employees will increased twice a year
Tripura Assembly election DA of government employees will increased twice a yearsakal
Updated on

आगरताळा : सत्तेवर आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी दोन वेळा ग्राहक दर निर्देशांकानुसार महागाई भत्त्यात वाढ देऊ तसेच आधीच्या निवृत्तिवेतन योजना लागू करू, अशी आश्वासने देणारा जाहीरनामा त्रिपुरातील भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआयएम) नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने शुक्रवारी जाहीर केला. त्रिपुरात १ लाख ८८ हजार ४९४ सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक आहेत.

विधानसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला मतदान होणार आहे. डाव्या आघाडीचे निमंत्रक नारायण कार यांनी पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रकाशित केला. अडीच लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती, वार्षिक उत्पन्न एकालाखा पेक्षा कमी असलेल्या ६० वर्षे वयावरील व्यक्तींना सामाजिक निवृत्तिवेतन हे १५ पानी जाहीरनाम्यातील इतर मुद्दे आहेत.

कामावरून कमी करण्यात आलेल्या १० हजार ३२३ शिक्षकांची फेरनियुक्ती, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांना वर्षाकाठी २०० दिवस काम आणि आदिवासी मंडळाला स्वायत्तता अशी आश्वासनेही देण्यात आली. सीपीआयएम ४३ जागा लढविणार आहे. तीन मित्र पक्षांना प्रत्येकी एक जागा दिली. काँग्रेससह जागावाटपाचा करार झाला आहे. काँग्रेसला १३ जागा देण्यात आल्या.

सत्ताधाऱ्यांवर टीका

नारायण कार यांनी सत्ताधारी भाजप-आयपीएफटी (इन्डीजीनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा) आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप २०१८ मध्ये सत्तेवर आल्यापासून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला. आवाज उठविण्याचा अधिकारही जनतेने गमावला आहे. डाव्या आघाडीने निवडणूका जिंकल्यास लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()