राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष सीपीएमनं 214 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
अगरतला : त्रिपुरातील (Tripura) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांच्या अनुपस्थितीमुळं भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा फायदा झालाय. पक्षानं 20 पैकी 7 ठिकाणी बिनविरोध विजय संपादन केलाय. विशेष म्हणजे, 7 जागांवर विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले नाहीत. या 7 संस्थांशिवाय या महिन्यात आणखी 13 संस्थांवर निवडणुका होणार आहेत. भाजपनं सर्व 20 शहरी संस्थांमध्ये 336 उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, निवडणुकीची तारीख 25 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलीय.
धलई जिल्ह्यातील कमालपूर नगरपंचायत (Nagar Panchayat Election), पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील जिरनिया नगरपंचायत, रानीरबाजार नगरपंचायत, मोहनपूर नगरपरिषद, विशालगड नगरपरिषद (Municipal Council Election), उदयपूर नगरपरिषद, संतीरबाजार नगरपरिषद येथे विरोधकांनी उमेदवार उभे केले नव्हते. याउलट भाजपच्या उमेदवारांची संख्या एकूण जागांपेक्षा (334) जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षाच्या सूत्रांचं म्हणणं आहे, की दोन उमेदवार लवकरच आपले अर्ज मागे घेतील.
इतर पक्षांची काय स्थिती?
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष सीपीएमनं 214 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर सीपीआय 6 जागांवर, आरएसपी 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षानं (Trinamool Congress Party) 125 तर काँग्रेसनं (Congress Party) 101 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 829 उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. यामध्ये आगरतला महापालिकेतील 212 तर अपक्ष 13 उमेदवार आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक पक्ष भाजपवर हिंसाचार पसरवल्याचा आरोप करत आहेत. त्रिपुरातील टीएमसी नेते सुबल भौमिक यांनी राज्य निवडणूक आयोगाकडं दाद मागूनही विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असं त्यांनी म्हटलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.