Truck Drivers Strike: सरकारनं कृषी कायद्यांसारखं करु नये, संध्याकाळपर्यंत...; ट्रक मालक संघटनेचा इशारा

'हिट अँड रन' प्रकरणाच्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्यानं याला देशभरातील ट्रक ड्रायव्हर्सनं जोरदार विरोध दर्शवला आहे.
truck driver strike for second day
truck driver strike for second day
Updated on

नवी दिल्ली : 'हिट अँड रन' प्रकरणाच्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्यानं याला देशभरातील ट्रक ड्रायव्हर्सनं जोरदार विरोध दर्शवला आहे. यासाठी ड्रायव्हर्स संपावर गेले आहेत. पण हा कायदा जाचक असल्यानं तो रद्द व्हावा अशी मागणी ट्रक मालक संघटनेनी केली आहे. सरकारनं ही मागणी गांभीर्यानं घ्यावी कृषी कायद्यांसारखं करु नये, असंही संघटनेचे चेअरमन मलकित सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Truk Drivers Strike Govt should not do like agricultural laws till evening take decision says Truck Owners Association)

truck driver strike for second day
जपान एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग, 350 जणांना सुखरूप काढले बाहेर

मलकित सिंग म्हणाले, आम्ही या संपाची दखल घेतली आहे. २७ तारखेला आम्ही सर्वांना या कायद्यातील कमतरता लक्षात आणून दिल्या आहेत. गृहमंत्री, पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल यांना लिखित स्वरुपात आम्ही तक्रारी कळवल्या. आम्ही चालकांच्या सोबत आहोत. 'चालक है तो मालक है, मालक है तो चालक है' अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

truck driver strike for second day
Raju Shetti: राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

जर गाडी पटरीवरून उतरली तर पुन्हा पटरीवर आणणं अवघड होईल, असं सांगताना पाणी आमच्या नाकाच्या वरून गेलं आहे, हे देशासाठी आणि आमच्यासाठी ठीक नाही असंही यावेळी सिंग यांनी म्हटलं आहे. उशीर करू नका, जेवढा उशीर कराल तेवढी परिस्थिती हाताबाहेर जाईल. आम्ही संयमाने काम करतो आहे. आगीत तेल ओतण्याची आमची भूमिका नाही. हा कायदा रद्द करावा लागेल, जर अजून काही दिवस हीच स्थिती कायम राहिली तर कठीण होईल.

truck driver strike for second day
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर आंदोलनासंबंधीत ३१ वर्षांपूर्वीच्या केसमुळे पुन्हा वादंग; भाजपचे काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप

जर ड्रायव्हर सोडून गेले तर त्यांना परत आणणं कठीण होईल. सरकारनं ताबडतोब याची दखल घ्यावी. सरकारने तातडीने कायदे रद्द करण्याची घोषणा केली. आम्हाला आशा आहे की, आज संध्याकाळपर्यंत यावर उपाय शोधला जाईल. सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये, जास्त वेळ वाया घालवू नका, असंही यावेळी मलकित सिंग म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()