Video : अख्खा ट्रक गेला खड्ड्यात; व्हिडिओ तुफान व्हायरल

दिल्लीच्या नजफगढ भागात एका मोठ्या खड्ड्यात पूर्ण ट्रकच सामावून गेला. ट्रक खड्ड्यात जातानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
Truck Accident
Truck Accident Google file photo
Updated on
Summary

दिल्लीच्या नजफगढ भागात एका मोठ्या खड्ड्यात पूर्ण ट्रकच सामावून गेला. ट्रक खड्ड्यात जातानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाचा फटका राजधानी दिल्लीलाही बसला आहे. बुधवारपासून दिल्लीत पाऊस पडत असल्याने दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या ४५ वर्षातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. याच दरम्यान दिल्लीतील एक खतरनाक व्हिडिओ समोर आला आहे. (Truck fell into a caved portion of road in Najafgarh in Delhi Video viral)

Truck Accident
ब्लॅक फंगस कसा ओळखाल? उपचार काय? AIIMSची नवी नियमावली

दिल्लीच्या नजफगढ भागात एका मोठ्या खड्ड्यात पूर्ण ट्रकच सामावून गेल्याचे दिसून आले. ट्रक खड्ड्यात जातानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होऊ लागला आहे. नजफगढमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणचा भरावही वाहून गेला आहे. रस्त्याने जाणारा ट्रक खड्ड्यात गेला, त्यानंतर तेथील लोकांनी ट्रकचा ड्रायव्हर आणि त्याच्या सहायकाला सुखरूप बाहेर काढले.

Truck Accident
राजधानीत पाणीच पाणी; पावसाने मोडला ४५ वर्षांचा रेकॉर्ड

दिल्लीच्या काही भागात मेट्रोचं काम सुरू आहे. तर नजफगढमध्ये भूमिगत मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे काही घरांना तडे गेले आहेत. नजफगढमध्ये पावसाळ्यात जमीन खचण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. बुधवारीही रात्री जोरदार पाऊस झाल्याने रस्त्याच्या कडेचा भाग खचला. मेट्रोच्या कामगारांनी तेथे रस्ता वाहनांसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिले.

समोरून येणाऱ्या ट्रकला त्यांनी थांबण्याच्या सूचना दिल्या मात्र, ट्रक चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ट्रक खड्ड्यात गेला. ट्रक चालकाला आणि त्याच्या सहायकाला मेट्रोच्या कामगारांनी सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.