True Friendship : यारी लय भन्नाट हाय! मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनी परिक्षा सोडून जमवले ४० लाख!

स्विटीला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रांनी अहोरात्र एक केले.
True Friendship
True Friendship esakal
Updated on

सोशल मिडियाच्या जमान्यात मित्राचे रील व्हायरल झाले तर त्याला जवळ करणारे टेंपररी मित्र अनेक मिळतील. पण, जय विरूसारखी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ पॉवरफुल मैत्री क्वचितच मिळते. अशीच एक प्युअर मैत्री ग्रेटर नोएडामध्ये पहायला मिळाली आहे.

नोएडामध्ये बी.टेक.च्या शेवटच्या वर्षामध्ये शिकणाऱ्या स्विटी नावाच्या विद्यार्थीनीचा कॉलेजला जात सेक्टर डेल्टा 2 जवळ अपघात झाला होता. तिला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी खर्च जास्त येणार होता. स्विटीच्या घरची परिस्थिती पाहता तिच्यावर उपचार करणे घरच्यांना परवडणारे नव्हते.

True Friendship
True Friendship : खरा मित्र कसा ओळखावा?

अशा परिस्थितीत तिच्या मित्रांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले. स्विटीला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रांनी अहोरात्र एक केले. या अवाहनानंतर त्यांच्या अकाऊंटवर मदतीचा ओघ सुरू झाला. त्यानंतर 10 दिवसांत सुमारे 40 लाख रुपये जमा करण्यात आले. जे स्विटीच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतात. आता स्विटीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

True Friendship
Apurva Nemlekar on Bigg Boss: अक्षयसोबतची निखळ मैत्री, मांजरेकरांचा सिनेमा, अपूर्वाची खास मुलाखत

स्वीटीला अपघातानंतर उपचारासाठी ‘कैलास’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्विटीचे मित्र आशीर्वाद मणी त्रिपाठी, करण पांडे, आदर्श सिंह, राज श्रीवास्तव, अनुभव यादव, राजमणी, चंदन सिंह, शुभम, प्रतीक यांनी स्वीटीच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की ते तिच्या उपचाराच्या खर्चात मदत करतील. त्या आठ मित्रांनी स्वत: आणि काही कॉलेज मित्रांकडून देणगी गोळा केली. हॉस्पिटलमध्ये सुमारे एक लाख रुपये जमा करून स्विटीवर उपचार सुरू करण्यात आले.

True Friendship
Dhule News : न्याहळोदची बोरे दिल्ली, कोलकत्यात! ॲप्पल बोरांद्वारे शोधला उन्नतीचा मार्ग

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्विटीच्या उपचारासाठी अंदाजे 30 ते 35 लाख रुपये खर्च येणार होता. त्यानंतर त्या आठ मित्रांनी पैसे जमा करण्यासाठी रात्रंदिवस एक केले. स्विटीचा फोटो आणि तिच्या वडिलांचा अकाउंट नंबर ट्विटर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. स्विटीच्यासाठी 10 दिवसांत सुमारे 30 लाख रुपये जमा झाले.

True Friendship
Delhi Accident Case: मृत तरुणीच्या घरी चोरी, दिल्ली पोलिसांच्या कारभारावर सवाल

पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी त्यांच्या पोलिस खात्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने स्विटीसाठी आर्थिक परिस्थिती पाहता 10 लाख रुपयांची मदत केली. आता स्विटीच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. स्विटीने तिच्या मित्रांचे आभार मानले आणि मला माझ्या मित्रांचा अभिमान असल्याचे सांगितले.

True Friendship
Solapur Accident News: चालकांनो, सोलापूर महामार्गावर सावधान! वर्षभरात १७८ गंभीर अपघात

दुसरीकडे, मित्रांचे म्हणणे आहे की, आम्हाला परिक्षेपेक्षा स्वीटीची जास्त काळजी आहे. परिक्षा पुन्हा देता येईल. पण उपचारात निष्काळजीपणा झाला असता नव्हता. मैत्रीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या मैत्रीणीला मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()