केंद्र सरकारच्या दणक्यानंतर मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटरला देखील जाग आली असून सरकारी नियमांचे पालन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या दणक्यानंतर मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्म ट्विटरला देखील जाग आली असून सरकारी नियमांचे पालन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कंपनीकडून काही भारतातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्राचे नवे नियम पाळण्यासाठी आम्ही सर्वोतपरी तयार आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आता कंत्राटी तत्त्वावर निवासी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक केली असून कायमस्वरूपी मुख्य तक्रार अधिकाऱ्याच्या नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. (twitter agree to follow central government guidelines appoints nodal officer)
ट्विटरच्या प्रवक्त्याने याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की ‘‘ सरकारच्या नियमांचे महत्त्व आम्हाला पटले असून आम्ही ते लागू करणार आहोत. सरकारने २५ फेब्रुवारी रोजीच याबाबतची अधिसूचना जाहीर केली होती पण कोरोनामुळे सगळी यंत्रणाच ठप्प झाल्याने काही नव्या नियुक्त्या करणे आम्हाला शक्य झाले नाही. त्यामुळे निर्धारित वेळेमध्ये आम्हाला काही गोष्टी पूर्ण करता आल्या नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये आम्ही तुमच्यासमोर अतिरिक्त तपशील सादर करू. ’’ सध्याच्या आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही भारतीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत असेही ट्विटरकडून सांगण्यात आले. दरम्यान फेसबुक आणि गुगलने मात्र याआधीच सरकारी नियम पाळण्याची तयारी दर्शवीत वाद टाळण्याचा प्रयत्न केला होता. ट्विटरने मात्र नवे डिजिटल नियम पाळण्यास नकार दिला होता.
सरकारने गेल्या फेब्रुवारीत नव्या आयटी नियमांची घोषणा केली होती. या नियमांचं पालन करण्यासाठी सरकारने तीन महिन्यांचा अवधी दिला होता. या नव्या नियमांअंतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना तरतूद करणं आवश्यक आहे. यामध्ये मुख्य नोडल अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी इत्यादींची नियुक्ती समाविष्ट आहे. सरकारने गेल्याच आठवड्यात नियमांचं पालन न केल्यामुळे कंपनीला कडक शब्दांत एक शेवटची नोटीस पाठवली होती. त्याननंतर ट्विटर नमले असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासंदर्भातील ट्विटर इंडिया आणि भारत सरकारच्या दरम्यानचा हा वाद त्यामुळे निकाली लागला असं म्हणावं लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.