'NEET' Exam : दोन उत्तरांपैकी योग्य कोणते?

‘नीट-यूजी’ परीक्षेतील भौतिक शास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या १९ व्या क्रमांकाच्या प्रश्नाची दोन उत्तरे आहेत. यापैकी योग्य उत्तर कोणते, याची माहिती मंगळवार दुपारपर्यंत सादर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आयआयटीला केली आहे.
'NEET' Exam
'NEET' Examsakal
Updated on

‘नीट’ परीक्षेचा वाद

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ परीक्षेतील भौतिक शास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या १९ व्या क्रमांकाच्या प्रश्नाची दोन उत्तरे आहेत. यापैकी योग्य उत्तर कोणते, याची माहिती मंगळवार दुपारपर्यंत सादर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आयआयटीला केली आहे. तीन तज्ज्ञांची समिती नेमून योग्य उत्तर शोधले जावे व ते सादर केले जावे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले. उद्या (ता. २३) सुनावणी होणार आहे.

भौतिकशास्त्रातील १९ व्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त (ग्रेस) गुण देण्यात आले होते. यामुळे ४४ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते, असा मुद्दा याचिकाकर्त्यांकडून सुनावणी दरम्यान मांडण्यात आला. ‘एनसीईआरटी’च्या नव्या अभ्यासक्रमानुसार संबंधित प्रश्नासाठी चौथा पर्याय हे उत्तर योग्य असेल तर, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय निवडणाऱ्यांना पूर्ण गुण दिले जाऊ शकत नाहीत, अशी टिपणी सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान केली.

जुन्या अभ्यासक्रमानुसार चार लाख २० हजार ७७४ विद्यार्थ्यांनी क्रमांक दोनचा पर्याय निवडला होता, तर नव्या अभ्यासक्रमानुसार नऊ लाख २८ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी चौथ्या क्रमांकाचा पर्याय निवडला होता. युक्तिवाद ग्राह्य धरला तर ज्या ४४ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले त्यांचे गुण ७१५ पर्यंत कमी होतील, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले. तुम्ही जे काही केले आहे, त्याचा चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे, असे चंद्रचूड यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला सुनावले.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे..

  • ‘नीट’ पात्र झालेल्यांची फेरपरीक्षा घ्या

  • २०१५ मध्येही अनियमिततेनंतर सहा लाख विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा

  • प्रश्नपत्रिका फुटीचा गैरव्यवहार २५०० कोटी रुपयांचा

  • लातूर, राजकोट ही चांगली शिक्षण केंद्रे नाहीत

  • परीक्षेचा विस्तृत निकाल ‘एनटीए’ने जाहीर केलेला नाही

  • निकाल जाहीर करताना सिरीअल क्रमांक दिले, हे अयोग्य.

न्यायालयाचे निरीक्षण

  • परीक्षेच्या (५ मे) आधी प्रश्नपत्रिका फुटल्याची शक्यता

  • प्रश्‍नपत्रिका स्ट्राँग रुममधूनच फुटली असावी, असे मानण्यास वाव

  • देशपातळीवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.