औषध बनवणाऱ्या सिप्ला कंपनीत कोल्हापूर, सांगलीच्या दोन तरुणांचा मृत्यू; नेमकं कुठे अन् काय घडलं?

Two Deid in cipla verna unit : गोव्यातील वेर्णा येथील सिप्ला या औषध निर्मीती कंपनीत झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२५ जुलै) घडली.
 cipla verna unit goa marathi news
cipla verna unit goa marathi news
Updated on

गोव्यातील वेर्णा येथील सिप्ला या औषध निर्मीती कंपनीत झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२५ जुलै) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघातानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे सिप्ला युनिट-२ ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर दुरुस्ती करण्यासाठी लिफ्टच्या खड्यात उतरले होते. त्यावेळी गुदमरुन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पवार (२४) हा सांगलीचा तर अक्षय पाटील (२७) हा कोल्हापूर येथील होता. हे दोघे एनजे रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. तर तिसरा कर्मचाऱ्यावार रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे.

दरम्यान वेर्णा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या तरतुदीनुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे . दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी कळवले असून कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

 cipla verna unit goa marathi news
Jasprit Bumrah: 'तो तर मीच!', भारताच्या महान कर्णधाराच्या प्रश्नावर बुमराहचं अजब उत्तर; धोनी, विराट, रोहितबद्दलही केलं भाष्य

न्याय मिळणार?

आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी दोन कामगारांच्या मृत्यूचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सिप्ला कंपनीत गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू झाला ही घटना मोठी असून, मृत कामगार गोंयकार असो किंवा परप्रांतीय त्यांना न्याय मिळायला हवा. तसेच, कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप यावेळी सरदेसाई यांनी केला.

दरम्यान याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंपनी कोणतीही असो याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सभागृहात सांगितले.

 cipla verna unit goa marathi news
Koyna Dam : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; कृष्णा-कोयना नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.