अमेरिकेत लस घेतलेले झाले मास्क फ्री, पण भारतात का नाही?

सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) विभागानं याबाबत मार्गदर्शकतत्वं लागू केले आहेत.
Mask
Mask
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस (Two dose of covid vaccine) घेतलेल्या नागरिकांना आता मास्क (mask) वापरणं बंधनकारक राहिलेलं नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) विभागानं म्हटलंय की, ज्या लोकांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे. त्यांना मास्क लावण्याची गरज नाही. मात्र, भारतात लशींचे दोन डोस घेतलेल्या लोकांनाही मास्क वापरणं अनिवार्य आहे. याबाबत सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिकेप्रमाणं भारतात घोषणा करणं सध्या घाईचं ठरेल. (Two doses of vaccines completed in US became mask free but not in India Know the reason)

सातत्याने कोरोना विषाणू बदलतोय रुप

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा विषाणू सातत्याने म्युटेट होत आहे. (रुप बदलतोय) त्यामुळे नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यातच ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाही काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क लावणं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं त्यांच्यासाठीही हे गरजेचं आहे.

Mask
देशात दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होईल : AIIMS

गुलेरिया पुढे म्हणतात, "आमच्याजवळ जोपर्यंत पुरेसा डेटा येत नाही तोपर्यंत आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हा विषाणू खूपच हुशार आहे आणि वारंवार आपलं रुप बदलतं आहे. नव्या व्हेरियंटबाबत बोलायचं झाल्यास आपण हे बोलू शकत नाही की, लशीमुळे आपल्याला किती सुरक्षा मिळेल. त्यामुळे आपल्याला मास्क वापरत राहणं गरजेचं आहे तसेच फिजिकल डिस्टंसिंग पाळणंही गरजेचं आहे. कारण व्हेरियंट कुठलाही असला तरी मास्क आणि फिजिकल डिस्टंसिंग आपल्याला वाचवेल.

ब्रेक थ्रू इन्फेक्शनमुळे मास्क अनिवार्य राहणार

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, "भारतात अद्याप सल्लागार समितीनं जाहीर केलेल्या नियमांमध्ये बदल करण्याचं धोरणं तयार झालेलं नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं की, आपण सध्या अशा टप्प्यात असा धोका पत्करु शकत नाही. अद्याप ब्रेक थ्रू इन्फेक्शनचे (जे लोक दोन डोस घेतल्यानंतरही बाधित होत आहेत) प्रकार समोर येत आहेत, भलेही त्यांचं प्रमाण कमी असेल. त्यमुळे मास्कला आपण टाळू शकत नाही"

अमेरिकेत मास्क बंधनकारकता रद्द करण्यामागे आहे हे कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय की, "अधिकाधिक अमेरिकन लोकांना लवकरात लवकर लस देण्याच्या आमच्या असामान्य यशस्वी कार्यक्रमामुळे हे शक्य झालं आहे." सीडीसीने दिलेल्या नव्या गाइडलाइन्सचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, "लशीचे पूर्ण डोस घेतलेल्या लोकांना कोविड-१९ची बाधा होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. लसीनं लोकांमध्ये कोरोनाचं प्रसार होण्याचा धोका कमी केला आहे."

आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी लस प्रभावी

अमेरिकेचं रोग नियंत्रण आणि निर्मुलन केंद्राचं (सीडीसी) म्हणणं आहे की, "कोविड-१९ लस आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी ज्या लोकांनी लसीचे डोस घेतले आहेत. ते पुन्हा आपलं काम करण्यास सुरुवात करु शकतात. जी कामं महामारीदरम्यान थांबली होती." सीडीसीच्या माहितीनुसार, सिंगल डोस मालिका आणि दोन डोसच्या मालिकेत दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर संबंधित व्यक्तीचं पूर्णपणे लसीकरण झाल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.