Viral Video: रिलसाठी काहीपण! रंग खेळून गाडीवर अश्लील चाळे, तरुणींना 33 हजारांचा दंड

Noida Holi Video: संबंधीत व्हिडिओ ग्रेटर नोएडा येथील होता. यामध्ये एक मुलगा दुचाकी चालवत आहे. तर मागे बसलेल्या दोन मुली रंग खेळत अश्लील चाळे करत आहेत.
Noida police fined girls kissing on Bike
Noida police fined girls kissing on BikeEsakal
Updated on

देशभरात काल होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, काही उपद्व्यापी लोकांनी होळीचा सणाला कलंक लावण्याचे काम केले.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन मुली आणि एका मुलासह तीन व्यक्ती स्कूटरवरून जात असल्याचे दिसत आहे. मुलगा स्कूटर चालवत आहे तर मुली अश्लील चाळे करताना दिसत आहे.

यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर आता नोएडा पोलिसांनी कारवाई केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली ‘मोहे रंग लगा दे’ गाण्यावर स्कूटरवर बसून नाचताना दिसत आहेत. मुली नाचत नाचत, गाडीवर अश्लील कृत्ये करत आहेत. असे असले तरी सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत आहेत आणि कारवाईची मागणी करत होते.

दरम्यान, नोएडा पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत घटनेचा तपास सुरू केला. व आरोपींना शोधून काढले.

X वरील पोस्टमध्ये, नोएडा वाहतूक पोलिसांनी "वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 33 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे," असे म्हटले आहे.

Noida police fined girls kissing on Bike
Arvind Kejriwal: जेलमधून केजरीवालांनी दोन आदेश दिले? ईडीने दिले स्पष्टीकरण,'त्यांना सही करण्याची परवानगी...'
Noida police fined girls kissing on Bike
Raghuram Rajan: 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार म्हणजे मूर्खपणा, रघुराम राजन असं का म्हणाले?

संबंधीत व्हिडिओ ग्रेटर नोएडा येथील होता. यामध्ये एक मुलगा दुचाकी चालवत आहे. तर मागे बसलेल्या दोन मुली रंग खेळत अश्लील चाळे करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन जण हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.