छत्तीसगढ-तेलंगना सीमेवर चकमक; दोन नक्षलवादी ठार

Chhattisgarh Maoist attack
Chhattisgarh Maoist attack sakal media
Updated on

छत्तीसगढच्या नक्षलग्रस्त (Chhattisgarh-Telangana border) भागात आंध्र प्रदेशच्या पोलीसांचे विशेष पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी १८ जानेवारीला झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या ग्रेहाउंड (Greyhounds special force) या विशेष पथकानं नक्षलविरोधी मोहीम हाती घेत मोठी कारवाई करत दोन नक्षलींना कंठस्नान (Two Maoists killed) घातलं आहे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Two Maoists killed in encounter with greyhounds police special forces at Chhattisgarh-Telangana border)

Chhattisgarh Maoist attack
Antrix Devas हा फसवणुकीचा करार; अर्थमंत्र्यांचा UPA सरकारवर गंभीर आरोप

छत्तीसगढच्या इलमिडी आणि उसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत पोलिसांना मोठं यश आलं आहे. ठार झालेल्या नक्षलींकडून एक लाईट मशिन गन, INSASआणि SLRरायफल पोलिसांनी हस्तगत केले आहे.

"छत्तीसगढ सीमेवर दोन्ही बाजूंनी चकमक सुरु झाली. नक्षलविरोधी मोहीम सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर पुढील तपशील देण्यात येईल" अशी माहिती मुलगूचे पोलीस अधिक्षक संग्रामसिंग पाटील गणपतराव यांनी दिलीय. दरम्यान ग्रेहाउंडच्या पथकानं दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून नक्षलविरोधी मोहीम सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()