मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील डाबरा शहरात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी आधी त्याच्या घराबाहेर फिरणाऱ्या एका व्यक्तीचे नाव विचारले आणि त्याने नाव सांगताच त्याची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. हत्येचा हा संपूर्ण प्रकार कॉलनीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.