पाटणा: महिलांचा सन्मान व्हावा म्हणून आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र खरचं महिला इतक्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न बिहारच्या (Bihar) घटनेने उपस्थित होत आहे. काल बिहारच्या शेखपुरा (Sheikhpura) जिल्ह्यातील बारबिघा पोलिस स्टेशन परिसरात ५ किशोरवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुली शेतात भाजीपाला तोडायला गेल्या असताना ही घटना घडली. यावेळी किशोरवयीन मुलांनी मुलींचा विनयभंग केला. या मुलांनी मुलींना काही रूपयेही दिले. तसेच याबाबत कोणालाही माहिती न देण्याची धमकी त्यांनी दिली. नातेवाईकांना हे समजताच त्यांनी त्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र यावेळी ३ मुले पळून जाण्यात यशस्वी झाली. या मुली सरकारी शाळेत इयत्ता ६ वी व ७ वीत शिकत आहेत. आरोपींपैकी ३ जण ६ वीच्या वर्गात शिकत आहेत, तर एक आरोपी ७ वीत तर दुसरा ८ वीच्या वर्गात शिकत आहे.
सापडलेली दोन मुले आणि पळून गेलेली मुले ही एकाच गावचे रहिवासी आहेत. यातील एक मुलगा हा मुलींच्या शेजारी राहतो असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी २ आरोपींना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस तपास करत आहेत. या दरम्यान मुलांनी स्मार्ट फोनवर पॉर्न व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
आरोपी अल्पवयीन असल्याने सध्या ते बाल कल्याण संकुल येथे रिमांड होममध्ये आहेत. यांच्यावर कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकार्यांसमोर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांच्यावर ३७६ डी (सामूहिक बलात्कार), ५०६ (२) (गुन्हेगारी धमकावणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट) आणि ११४ (गुन्हा घडल्यावर उपस्थित राहणे) यासह भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक गुन्ह्या संदर्भात या आरोपींनी जास्तीत जास्त शिक्षा होईल असे शेखपुराचे पोलिस अधीक्षक कार्तिकेय के शर्मा (Kartikeya K Sharma) यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.