पिकनिकला जाण्यासाठी शाळकरी मुलांनी बंदुकीच्या धाकावर पळवली कार

बंदुकीच्या धाकावर (gunpoint) कार पळवून नेल्याच्या अनेक घटना आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. पण सोमवारी...
AI Car
AI CarGoogle
Updated on

नवी दिल्ली: बंदुकीच्या धाकावर (gunpoint) कार पळवून नेल्याच्या अनेक घटना आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. पण सोमवारी दिल्लीमध्ये (delhi) प्रत्यक्षात अशी घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे इथे आरोपी सराईत गुन्हेगार नसून दोन अल्पवयीन शाळकरी मुलं (scholl children) आहेत. ड्रीम व्हेकेशन (dream vaccation) म्हणजे पसंतीच्या हिल स्टेशनवर मनासारखी मौजमजा करता यावी, यासाठी बंदुकीच्या धाकावर त्यांनी कार पळवली. दोन्ही आरोपी अल्पवयीन असून ते गुरुग्राम आणि दिल्लीच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांनी सोमवारी राजीव चौक येथून एक टॅक्सी बुक केली. (Two minors snatch cab at gunpoint in Gurugram to go on hill station dmp82)

बुधवारी सेक्टर १० मधून या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले. ट्रीपच्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी ते आणखी काही जणांना टार्गेट करण्याच्या विचारामध्ये होते. दोन्ही आरोपी बालपणीचे मित्र असून काही महिन्यांनी ते १८ वर्षाचे होतील. "दोन्ही मुलांचे स्वत:च्या कारने हिल स्टेशनला जायचे. तिथल्या महागड्या हॉटेलमध्ये रहाण्याचा प्लान होता. दोन्ही मुले सामान्य कुटुंबातून येतात. त्यामुळे कार विकत घेणे, त्यांच्यासाठी कठिण होते. त्यामुळे त्यांनी कार पळवण्याचा कट रचला" असे पोलिसांनी सांगितले.

AI Car
विदर्भातील व्यावसायिकाने मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेलवर केला बलात्कार

राजीव चौक येथून अॅपच्या माध्यमातून त्यांनी टॅक्सी बुक केली. काही मिनिटांच्या प्रवासानंतर एका मुलाने पिस्तुल काढले व ड्रायव्हरवर रोखले. त्याने ड्रायव्हरला गाडीतून उतरायला सांगितले. पण ड्रायव्हर तयार होत नव्हता. त्यावेळी दुसऱ्या मुलाने फुटलेली बिअरची बाटली ड्रायव्हरची गळ्यावर ठेऊन गळा चिरण्याची धमकी दिली.

AI Car
'आता लोकल सुरु करा अन्यथा...'मनसेचा आंदोलनाचा इशारा

अखेर जीवाच्या भीतीने ड्रायव्हरने त्यांची मागणी मान्य केली. ड्रायव्हरला कार बाहेर काढल्यानंतर दोन्ही आरोपी गाडी घेऊन तिथून निघून गेले. दोन्ही मुले अल्पवयीन असली, तरी त्यांच्याविरोधात कलम ३७९ बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही आरोपींना बुधवारी सेक्टर १० मधून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.