Rabindranath Tagore : नोबल विजेते पहिले भारतीय; दोन देशांचं लिहिलंय राष्ट्रगीत

rabindranath tagores
rabindranath tagores
Updated on

Rabindranath Tagore Death anniversary 2021: नोबल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रविंद्रनाथ टागोर यांची आज पुण्यतिथी. 7 ऑगस्ट 1941 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज देशभरातून लोक रविंद्रनाथ टागोर यांना 80व्या पुण्यतिथीनिमित्ताने श्रध्दांजली अर्पण करीत आहे. सोशल मिडियावर नोबल पुरस्कार ट्रेंड होत आहे.

भारत आणि बांगलादेशाची सीमा वेगळी झाली असली तरी या दोन्ही देशांना संस्कृती आणि रविद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore ) यांच्यामुळे आजही एकेमकांशी जोडलेला आहे. आज दोन्ही देश रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी वाटणारे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे. टागोर यांनी 1905 मध्ये बांगला देशाचे राष्ट्रगीत ''अमार शोनार बंगाल'' लिहले होते. गगन हरकरा यांचे "अमी कोठे पाबो तारे" या गाण्यातून राष्ट्रगीताची गाण्याची चाल स्वीकारली गेली.

rabindranath tagores
...तर मागास समाजात कास्ट नाही पण, क्लास निर्माण होतील : फडणवीस

टागोरांनी 1905 मध्ये बंगालच्या पहिल्या फाळणीनंतर मातृदेश बंगालला शुभेच्छा देण्यासाठी 'अमार शोनार बंगाल' लिहिले होते. नंतर, बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान, गाण्याच्या पहिल्या 10 ओळी 1971 मध्ये देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या गेल्या. सुरवातील बंगालीमध्ये 'भारतो-भाग्यो-बिधाता' लिहिलेले गेलेले गीत नंतर 24 जानेवारी 1950 मध्ये 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले.

दोन राष्ट्रगीतांनी नकळतपणे अनेक प्रसंगांमध्ये दोन देशांच्या लोकांना जोडले आहे. त्यापैकी बहुतेक दोन देशांमधील क्रिकेट सामने आहेत. 2016 मधील वल्ड टी-20 किंवा 2019 मधील वर्ल्ड कप असो दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांनी टागोरांनी लिहिलेल्या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गाऊन आनंद घेतला.

Rabindranath Tagore
Rabindranath TagoreTwitter file photo
rabindranath tagores
राज्यात 14 संवर्धन राखीव क्षेत्र अभयारण्य होणार? उपसमिती करणार पडताळणी

फाळणीनंतर विभागलेल्या लोकांनी प्रेम आणि एकतेच्या भावनेने जोडण्याच्या आशेने बांगला देशाचे राष्ट्रगीत लिहिले गेले आहे. राजकीय फाळणीबाबत लोंकामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि बंगालमधील लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे हे या गाण्याचे उद्दिष्ठ होते.

सप्टेंबर 1905मध्ये पहिल्यांदा संगीत जर्नल नियतकालिकामध्ये ''शोंगीत बिग्गन प्रोबेशिका''मध्ये ऐकले होते, जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत गुणगुणले तेव्हा त्यांची भाचीने घाईघाईने म्युझिकल नोटेशन लिहून काढले होते. टागोर यांनी निर्माण केलेल्या जन गण मन आणि ''अमार शोनार बंगाल'' या दोन्ही गीतांना दोन्ही देशांच्या लोकांनी प्रेम मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.