श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (ता. १६) पुन्हा एकदा लष्कराने दहशतवाद्यांचा (Terrorists) नापाक डाव उधळून लावला. कुलगाममध्ये सुरू असलेल्या कारवाईत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Killed) केला आहे. शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येमध्ये या दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अनंतनागमध्येही हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराने परिसराची नाकेबंदी करून कारवाई सुरू केली आहे. (Two terrorists killed Army takes revenge for killing of Hindu teacher Rajni Bala)
काश्मीर झोनच्या पोलिस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. २४ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा (Killed) केला आहे. हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.
३१ मे रोजी कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका रजनी बाला यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. शाळेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. हल्ल्यातील दहशतवाद्यांचा (Terrorists) शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे काश्मीर पोलिसांनी तेव्हा सांगितले होते.
हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांशी चकमक
अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. निवासी भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. त्यांच्याशी चकमक सुरू आहे, असे आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.