उबर कॅबमधील पॅनिक बटन बिनकामाचं; महिलांच्या सुरक्षेची ऐशीतैशी

उबेर कॅब ड्रायव्हरकडून झालेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरणानंतर ही सुविधा आणण्यात आली आहे.
Uber-Company
Uber-Company
Updated on

नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेसाठी उबर कंपनीनं आपल्या कॅबमध्ये धोक्याचा इशारा देणारं पॅनिक बटण आलं आहे. पण हे बटण बिनकामाचं असल्याचं आता सिद्ध झालं आहे. दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर अशी सुविधा सार्वजनिक वाहनांमध्ये देण्यात आली आहे. याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं केलेल्या पडताळणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Uber cab panic button is useless shocking reality in Delhi aau85)

Uber-Company
Sri Lanka Crisis : राष्ट्रपती राजेपक्षे राजीनामा देणार असल्याचं निश्चित

दिल्लीमध्ये उबरच्या कॅबमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणाची सुविधा देण्यात आली आहे. नवी दिल्लीत उबर ड्रायव्हरकडून महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. यानंतर सर्व व्यावसायिक वाहनं उदा. टॅक्सी आणि बसमध्ये देखील पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आलं आहे. हे बटण थेट पोलिसांच्या सर्व्हिलन्स सिस्टिमशी जोडलेलं असतं. याच्या मदतीनं प्रवाशी विनास्मार्टफोन केवळ हे बटण दाबून पोलिसांना अॅलर्ट करता येतं.

Uber-Company
JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षा सेशन 1 चा निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

पण बलात्काराच्या घटनेला ८ वर्षे उलटल्यानंतरही दिल्ली एनसीआरच्या केवळ ११,००० कमर्शिअल वाहनांमध्ये पॅनिक बटण बसवण्यात आलं आहे. खरंतर नियम बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यामध्ये मोठी तफावत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत ५० उबर कॅबची पडताळणी केली. यामध्ये ४८ कॅबमध्ये पॅनिक बटण नसलेलं दिसून आलं आहे. तसेच मॉनिटरिंग सिस्टममध्ये अनेक प्रकारचा गोंधळ पहायला मिळाला. ज्यामध्ये सॉफ्टवेअर इंटिग्रेशचा मोठा मुद्दा आहे. ज्यामुळं पोलिसांपर्यंत रिअल टाईम संदेश पोहोचण्यात अडचणी येतात.

Uber-Company
Maharashtra Politics: सुनावणी लांबवणीवर पडणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष

५० उबर कॅबमध्ये केवळ सातच पॅनिक बटण होते. या सातपैकी पाच बटणं दाबल्यानंतर २० मिनिटांनी वाट पाहिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. ४३ कॅबमध्ये २९ पॅनिक बटन नव्हते. केंद्रीय रस्ते महामंडळानं २०१६ मध्ये पॅनिक बटणाच्या वापराच्या अधिसूचनेशिवाय २९ कार्समध्ये १५ ड्रायव्हर्सनं सांगितलं की, त्यांनी हरयाणा आणि युपीकडून फिटनेस प्रमाणपत्रासह ही वाहनं खरेदी केली होती. तर इतर १४ ड्रायव्हर्सनं म्हटलं की, २०१९ पूर्वी आपली कार खरेदी केली होती. त्यानंतर २०१९ नंतरच कारमध्ये पॅनिक बटण अनिवार्य झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.